Hyundai Kona Electric
Hyundai Kona Electric Saam Tv
बिझनेस

Hyundai SUVs वर मिळत आहे 4 लाखांपर्यंत सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

साम टिव्ही ब्युरो

Hyundai SUV Discount Offers:

प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Hyundai आपल्या अनेक पॉवरफुल SUV मॉडेल्सवर जबरदस्त सूट देत आहे. यामध्ये Hyundai Venue, Venue N Line, Alcazar, Tucson आणि Kona Electric या मॉडेल्सचा समावेश आहे. यातच जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असला तर हीच योग्य वेळ आहे. SUV प्रेमींनी चुकूनही ही संधी सोडू नका. नेमकी काय आहे ऑफर, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Hyundai Venue

या यादीत पहिले नाव ह्युंदाई व्हेन्यूचे आहे. टर्बो-पेट्रोल मॅन्युअल व्हॅरिएंटवर 35,000 रुपयांपर्यंत आणि ड्युअल-क्लच व्हेरिएंटवर 30,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यात 83 bhp, 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आणि 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. Hyundai वेणूने ही Kia Sonet, Tata Nexon आणि आगामी Mahindra XUV 3XO सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करते.

Hyundai Venue N Line

Hyundai Venue N Line वर 30,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये रोख सवलत आणि एक्सचेंज बोनसचाही समावेश आहे. Venue N Line मध्ये 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळते. Hyundai Venue N Line ची किमती 12.08 लाख ते 13.90 लाखपर्यंत (एक्स-शोरूम) आहे.

Hyundai Alcazar

Hyundai Alcazar च्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही मॉडेल्सवर एक्सचेंज बोनस आणि 55,000 रुपयांपर्यंत रोख सवलत मिळत आहे. Alcazar टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लसला टक्कर देते आणि सहा-सीटर आणि सात-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये येते. Hyundai Alcazar ची किंमत 16.78 लाख ते 21.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Hyundai Kona Electric

या यादीतील सर्वाधिक सवलत Hyundai Kona Electric वर उपलब्ध आहे. कंपनी या कारवार 4 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामुळे याची किंमत खूपच कमी झाली आहे. ही कार Tata Nexon EV आणि MG ZS EV सारख्या सेगमेंटमधील इतर इलेक्ट्रिक SUV ला टक्कर देते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT