प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS आपल्या स्टायलिश स्कूटर्ससाठी ओळखली जाते. TVS Scooty Pep Plus ही कंपनीची बाजारात असलेली स्मार्ट स्कूटर आहे. या स्कूटरचे वजन 93 किलो आहे. अशातच ही महिला आणि वृद्धांसह घरातील सर्व सदस्यांसाठी चांगला पर्याय ठरते.
TVS Scooty Pep Plus ची प्रारंभिक किंमत 65514 रुपये (एक्स-शोरूम) याचा टॉप व्हेरिएंट 81842 रुपये किमतीत (ऑन रोड) उपलब्ध आहे. यामध्ये कंपनी चार प्रकार आणि सहा रंग पर्याय देत आहे. ही हाय पॉवर स्कूटर 87.8cc BS6 इंजिनसह दिली जात आहे. यात एक साधा हँडलबार आणि डिजिटल डिस्प्ले ग्राहकांना मिळेल.
या TVS स्कूटरमध्ये 5.36 bhp पॉवर आणि 6.5 Nm टॉर्क आहे. रायडरच्या सुरक्षेसाठी, ही स्कूटर पुढील आणि मागील दोन्ही टायरवर ड्रम ब्रेकसह येते. या व्यतिरिक्त सुरक्षिततेसाठी यात Combined Braking System उपलब्ध आहे. यात 4.2 लीटरची इंधन टाकी आहे. दैनंदिन कामे करण्यासाठी ही स्कूटर बेस्ट आहे. ही हाय स्पीड स्कूटर आहे.
ही TVS ची एंट्री लेव्हल स्कूटर आहे. जी कंपनीने 2003 मध्ये खासकरून तरुणींसाठी सादर केली होती. त्यानंतर याचे अनेक अपडेटेड व्हर्जन्स आले आहेत. स्कूटरमध्ये सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन आहे, जे हाय पॉवर जनरेट करते.
यात मोबाइल चार्जर सॉकेट, सीटखालील स्टोरेज हुक, साइड स्टँड अलार्म, डीआरएल, ग्लोव्ह बॉक्स यासारखे चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर ग्राहकांना मिळणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.