Travel Insurance protects you from flight delays, cancellations, and lost baggage — a must-have for every traveler. saam tv
बिझनेस

Travel Insurance Tips: फ्लाइट रद्द होऊ द्या नाहीतर बॅग हरवू द्या; इन्शुरन्स असेल तर 'डोन्ट वरी', Travel Insurance साठी आत्ताच करा अर्ज

Travel Insurance Tips: प्रवास करताना आपल्याला अनेक अडचणी येतात. पण प्रवास विमा घेतल्याने तुमचा प्रवास सोपा होऊन जात असतो. प्रवास सोपा आणि त्रासमुक्त करायचा असेल तुम्हाला फक्त काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

Bharat Jadhav

  • ट्रॅव्हल इन्शुरन्समुळे प्रवासादरम्यान होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.

  • ऑनलाइन अर्ज करून काही मिनिटांत ट्रॅव्हल इन्शुरन्स घेता येईल.

  • फ्लाइट रद्द होणे किंवा बॅग हरवण्यावर विमा सुरक्षा मिळते.

अनेकांना प्रवास करण्याची हौस असते. देशांतर्गत असतो आंतरराष्ट्रीय सहली प्रवास करण्याची इच्छा असणारे कुठेही जाण्यास तयार असतात. पण प्रवास जितका मजेदार असतो तितकाच कधी कधी त्रासदायक ठरत असतो.फ्लाइट रद्द होणे, बस चूकणे, वस्तू हरवणे किंवा अचानक आजारपण येणं, यासर्व गोष्टींमुळे क्षणार्धात ट्रिपची मजा नाहीसा होत असते. यासर्व कटकटीपासून प्रवास विमा (इनशुरन्स) तुम्हाला सुटकेचा श्वास मिळवून देईल.

या विम्यामुळे तुमचे पैसे वाचवता आणि तुम्हाला इतर होणाऱ्या त्रासापासून सु्द्धा मुक्ती मिळते. जर तुमच्याकडे प्रवास विमा नसेल, तर आमच्या टिप्स वापरून आजच अर्ज करा.

फ्लाइट रद्द झाल्यास

जर तुमची फ्लाइट रद्द झाली किंवा फ्लाइटला काही तासांचा उशीर झाला, तरट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला परतावा मिळवून देतो. यामुळे अनपेक्षित खर्चाची शक्यता कमी होते.

तुमची बॅग किंवा सामान हरवल्यास

प्रवास करताना बॅग हरवणे ही सामान्य गोष्ट बनलीय. जर तुमच्याकडे विमा असेल, तर तुम्हाला तुमच्या पॉलिसी अंतर्गत भरपाई मिळू शकते. हा पर्याय विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी फायदेशीर ठरतो

मेडिकल इमरजन्सी

जर तुम्हाला तुमच्या प्रवासादरम्यान आजार किंवा अपघात झाला तर ट्रॅव्हल इन्शुरन्स वैद्यकीय खर्च मिळवून देतो. काही पॉलिसी कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सेवादेखील देतात. उपचाराचा खर्च खूप कमी होत असतो.

पासपोर्ट हरवले तर

जर तुमच्या पासपोर्ट हरवला तर ट्रॅव्हल इन्शुरन्स तेव्हाही कामात येतो. प्रवास विमा तुम्हाला हरवलेले पासपोर्ट परत मिळविण्यात मदत करके. त्यात एक विमा पर्याय देखील समाविष्ट आहे, जे तात्पुरता पासपोर्ट किंवा नवीन पासपोर्ट मिळविण्याचा खर्च कव्हर करत असतो. त्यासाठी तुम्हाला फक्त वेळेवर तक्रार नोंदवावी लागेल, जेणेकरून सर्व काम वेळेवर करता येईल.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

तुम्हाला माहिती भरावी लागेल. तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपनीच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि फॉर्म भरावा लागेल. तुम्ही एजंटला सर्व ट्रॅव्हल इन्शुरन्सची माहिती आधी विचारून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT