Traffic Rules Saam tv
बिझनेस

Traffic Rules: वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी! ५ वेळा नियम मोडला तर परवाना रद्द

Traffic Rules for Drivers: वाहतूकीच्या नियमात बदल करण्यात आले आहे. वाहतूकीचे नियम आणखी कडक केले आहेत. वर्षातून पाचवेळा जर निम मोडले तर तुमचा परवाना रद्द होऊ शकतो.

Siddhi Hande

वाहतूकीचे नियम आणखी कडक

वर्षातून पाचवेळा वाहतूकीचे नियम मोडल्यास कारवाई

गाडी रिन्युअल, विकता येणार नाही

वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता मोटार वाहन नियम कायद्यात सुधारणा केली आहे. अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम २०२६ मध्ये बदल केले आहेत. १ जानेवारीपासून या नवीन नियमांची अंबलबजावणी सुरु झाली आहे. हे नवीन नियम अधिक कडक झाले आहेत.

मोटार वाहन नियम २०२६ नुसार एका वर्षात वाहनावर वाहतूक नियम मोडल्यास कडक कारवाई होणार आहे. जर तुम्ही पाचवेळी नियम मोडले तर कठोर कारवाई होणार आहे. वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र, लोन, परमिट, एनओसी मिळणार नाहीये. याचसोबत तुम्हाला वाहन रिन्युअल आणि विकता येणार नाहीये.

वाहतूक नियम मोडल्यानंतर तीन दिवसांमध्ये ई-चलान पाठवले जाणार आहे. यानंतर चालानावर आक्षेप घेण्यासाठी दंड भरण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. याचसोबत ३० दिवसांची अतिरिक्त मुदत दिली जाणार आहे. दरम्यान, प्रलंबित दंड न भरल्यावर तुमचे वाहन परिवहन विभागाच्या पोर्टलवर ब्लॅकलिस्टमध्ये जाणार आहे.

एका वर्षात एकाच वाहनचालकाने पाचवेळा नियम मोडल्यास त्यांना सराईत गुन्हेगार मानले जाते. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. दुसरीकडे चालनवर आक्षेप घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर वाहनधारकास न्यायालयात जाण्याचा अधिकारी आहे. त्यासाठी दंडाची ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

नवीन केंद्रीय मोटार वाहन नियमात आता वाहनावर वर्षभरात पाचवेळी दंड झाला तर वाहन चालकांचा परवाना रद्द होऊ शकतो. दरम्यान, जोपर्यंत तुम्ही दंडाची रक्कम भरली नाही तर वाहनाची विक्री, नूतनीकरण, फिटनेस अशी कोणतीही कार्यवाही करता येणार नाही, असं विजय पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT