बिझनेस

Toyota EV Car: एकदा चार्ज करा अन् ५५०किलोमीटर पळवा कार; Toyota बाजारात उतरवणार इलेक्ट्रिक कार

Maruti eVX वर आधारित असणारी Toyota ची नवी इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येणार आहे. या कारमध्ये फोर-व्हील- ड्राइव्ह सिस्टीम असणार आहे.

Bharat Jadhav

टोयोटा भारतात नवी एक इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. ही सुझूकीच्या इलेक्ट्रिक कारवर आधारित आहे. टोयोटा आणि सुझुकी संयुक्तपणे कार आणणार असल्याची घोषणा दोन्ही कंपनीकडून करण्यात आलीय. या इलेक्ट्रिक कारमध्ये ६० kWh बॅटरी देण्यात येणार आहे, यामुळे एकदा चार्जिंग केल्यानंतर ही कार थेट ५५० किलोमीटरपर्यंत धावणार आहे. त्याचबरोबर या कारमध्ये फोर व्हील- ड्राइव्ह सिस्टीमची सुविधा देण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, सुझुकी आणि टोयोटाने संयुक्त रुपाने ही कार निर्माण करणार असल्याची घोषणा दोन्ही कंपनीकडून करण्यात आलीय.

दोन्ही कंपनींकडून त्यांच्या करारवर स्वाक्षरी करण्यात आलीय. सुझूकी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाचा पुरवठा टोयोटाला करणार. परंतु आतापर्यंत नवीन कारचं नाव काय असेल तर याची माहिती कंपनीकडून देण्यात आली नाहीये. परंतु ही एक इलेक्ट्रिक एसयुव्ही कार असेल आणि ही कार गुजरातमधील हंसलपूरमधील सुझुकी मोटार ग्रुपच्या प्लांट मध्ये करण्यात येणार आहे.

दोन्ही कंपन्यांनी एका प्रेस नोटद्वारे सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कारमध्ये ६०kWh ची बॅटरी देण्यात येईल. या इलेक्ट्रिक कारला टोयोटाला सप्लाय केला जाईल. टोयोटा नवीन ईव्ही भारतासह जगातील इतर दुसऱ्या देशातही विक्रीसाठी पाठवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या एसयुव्हीचं निर्मिती २०२५ वर्षाच्या मध्यात सुरू होईल, अशी शक्यता आहे. मारुती सुझूकी पुढील वर्षाच्या ऑटो एक्सपो २०२५ मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार Maruti eVX कारला सादर केलं जाईल. टोयोटाच्या नवी कारदेखील या कारवर आधारित असणार आहे.

या कारमध्ये काय असेल खास

मारुती सुझुकी भारत आणि परदेशात आपली नवी eVX इलेक्ट्रिक SUVची टेस्टिंग केली जात आहे. अनेकवेळा ही कार स्पॉट करण्यात आलीय. या कारची विविध ठिकाणी चाचणी करण्यात येत आहे. ही एक ग्लोबल इलेक्ट्रिक एसयुव्ही असणार आहे. लॉन्च करण्यात आल्यानंतर eVX वर आधारित असलेली टोयोटाची नवी कारचं मॉडेल सादर केली जाणार आहे. मात्र कारचं नाव वेगळं असणार आहे. या कारची निर्मिती पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. ही कार 4WD प्रणालीने सुसज्ज असेल. सध्या महिंद्रा आणि टाटा यांच्या इलेक्ट्रिक कारमध्ये फ्रंट-व्हील ड्राइव्ह सिस्टम देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

SCROLL FOR NEXT