jain bhikshu  Saam tv
बिझनेस

jain Bhikshu : मुकेश अंबानींच्या जवळच्या माणसाने घेतला संन्यास; वर्षाकाठी मिळायचा तब्बल 75,00,00,000 रुपये पगार

billionaire become jain bhikshu : मुकेश अंबानींच्या जवळच्या माणसाने घेतला संन्यास घेतला. या व्यक्तीला वर्षाला ७५ कोटी रुपये मिळायचे.

Vishal Gangurde

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे जवळचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी प्रकाश शाह यांनी गृहस्थ जीवन सोडून संन्यासी जीवन जगण्याचा निर्णय घेतला. प्रकाश शाह यांना वर्षाला जवळपास ७५ कोटी रुपयांचं पॅकेज मिळायचं. ते रिलायन्सच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यांना अंबानी यांचा उजवा हात म्हणून ओळखलं जायचं.

प्रकाश शाह यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी निवृत्ती घेतल्यानंतर प्रकाश शाह आणि त्यांची पत्नी नैना शाह यांनी महावीर जयंतीच्या दिवशी दीक्षा घेतली. शाह यांची संन्यास घ्यायची इच्छा होती. कोरोना काळात त्यांना संन्यास घ्यायचा विचार पुढे ढकलला. संन्यास घेतल्यानंतर जैन साधूला भौतिक सुखसोयींचा त्याग करावा लागतो.

प्रकाश शाह यांनी केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवली. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यांची पत्नी नैना या कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केलं आहे. दोघांना दोन मुले आहेत. त्यातील एका मुलाने आधीच दीक्षा घेतली आहे. तर दुसऱ्या मुलाचं लग्न झालं आहे. त्याला एक अपत्य आहे.

शाह यांनी रिलायन्समध्ये काम करताना अनेक प्रकल्पांचं नेतृत्व केलं. जामनगर पेटकोक गॅसीफिकेशन प्रकल्प आणि पेटकोक मार्केटिंग या प्रकल्पांचं त्यांनी नेतृत्व केलं आहे. त्यांना कामाची कार्यशैली आणि नेतृत्वगुणासाठी अंबानी कुटुंबाकडून विशेष मान मिळत असे.

प्रकाश शाह आता जैन साधू म्हणून पुढील आयुष्य व्यथित करणार आहेत. ते सर्वत्र अनवाणी फिरतात. ते पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करतात. त्याचबरोबर ते भिक्षा मागून जीवन जगतात. प्रकाश शाह आणि त्यांचा पत्नीचा दीक्षा विधी मुंबईतील बोरीवलीत आयोजन करण्यात आलं होतं. त्यांचा दीक्षा विधी धार्मिक पंरपरानुसार झाला. भौतिक सुखसोयी त्यागून संन्यास स्वीकारण्याला जैन धर्मात फार महत्व आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT