Smartphone Under 15000 SAAM TV
बिझनेस

Smartphone Under 15000 : किंमत फक्त १५ हजार, 108 मेगापिक्सल कॅमेरा अन् बरेच काही, हे ५ स्मार्टफोन पाहाच

Smartphones List : तुम्हाला बजेट कमी असूनही चांगला स्मार्टफोन आता विकत घेता येणार आहे. कोणते? जाणून घ्या आणि आजच खरेदी करा.

Shreya Maskar

तुम्ही जर कमी पैशात चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग साइटचा वापर करू शकता. यामध्ये तुम्हाला 15,000 रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन उत्तम फिचर्ससोबत मिळेल. या स्मार्टफोन पैशांसोबत कॅमेरा क्वालिटी आणि इतर फिचर्सही जबरदस्त असणार आहे. 15,000 रुपर्यांच्या कमी किंमतीत तुम्हाला पोको, इनफिनिक्स, रियलमी , रेडमी आणि एअरटेल या कंपनींचा समावेश आहे. हे स्मार्टफोन तुम्हाला कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर मिळेल.

Infinix Note 40X 5G

Infinix ब्रँडच्या Note 40X 5G च्या 8GB/256GB व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे. तुम्हाला 8 GB व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅम 16 GB पर्यंत वाढवता येऊ शकतो. या फोनला 6.78 इंचचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. मीडियाटेक डायमेंशन 6300 प्रोसेसर, 108 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5000 mAh पॉवरफुल बॅटरी आणि 18 वॅट फास्ट चार्ज सपोर्ट या भन्नाट फिचर्ससोबत हा फोन येतो.

Realme C53

Realme C53 स्मार्टफोनच्या 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर, 18 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट, 5000 mAh बॅटरी आणि 90 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.

itel S24

itel S24 स्मार्टफोनच्या 16GB/128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,490 रुपये आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर हा फोन मिळत आहे. 6.6 इंच एचडी प्लस डिस्प्ले, 5000 mAh बॅटरी आणि 108 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा या फोनला देण्यात आला आहे.

X6 Neo 5G

Poco X6 Neo 5G तुम्हाला 13,999 रुपयांना फ्लिपकार्टवर मिळू शकतो. ही 8GB/128GB वेरिएंटची किंमत आहे. या स्मार्टफोनचे फिचर्स असे की, यात 6.67 इंच एचडी प्लस डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंशन 6080 प्रोसेसर, 5000 mAh बॅटरी, 108 मेगापिक्सेल रिअर आणि 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi 13 5G

Redmi 13 5G अवघ्या 14,795 रुपयांना तुम्हाला मिळणार आहे. यात तुम्हाला 8GB/128GB वेरिएंट मिळेल. 108 मेगापिक्सेल रियर कॅमेरा तसेत क्वालकॉम प्रोसेसर देण्यात आले आहे. हा फोन 6.79 इंच एचडी प्लस डिस्प्ले मध्ये आहे. या स्मार्टफोनला 5G सपोर्ट देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यातील पोस्टल मतमोजणी संपली, थोड्याच वेळात ईव्हीएम मशीन घेऊ येणार..

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

SCROLL FOR NEXT