प्रत्येकालाच भविष्यासाठी थोडी पैशाची बचत करायला आवडतं. पगारातला काही भाग साठवला तर त्याचा भविष्यात अनेक तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही यासाठी विमा योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. त्यासाठी LIC च्या काही योजना तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील. यात तुम्ही सुरक्षितपणे गुंतवणूक करता येते, विम्याचे संरक्षण होते आणि गुंतवणूकीवर चांगला परतावा तुम्हाला दिला जातो. यासाठी पुढील ५ जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनांची माहिती तुम्ही आत्ताच जाणून घ्या.
एलआयसीची जीवन आनंद योजना सर्वात जास्त लोकप्रिय योजनांपैकी एक मानली जाते. कमी प्रीमियममध्ये मोठा फंड तयार करण्याची संधी या योजनेत तुम्हाला मिळते. तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणुक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी बोनस आणि मोठी रक्कम मिळू शकते. विशेष म्हणजे पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही विमा संरक्षण सुरू राहतं.
सेफ गुंतवणुकीला प्राधा्न्य देणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी LIC न्यू एंडोमेंट प्लान ही योजना योग्य आहे. यामध्ये तुम्हाला ठरलेला परतावा आणि बोनसचा लाभ मिळतो. बाजारातल्या इतर जोखमींपासून लांब राहून बचत आणि विमा संरक्षण या दोन्ही गोष्टींचा लाभ घेऊ या योजनेत घेता येतो.
जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर त्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेली ही प्रीमियम योजना आहे. कारण यामध्ये मोठ्या रकमेचं विमा संरक्षण मिळतं. यात कमी कालावधीसाठी प्रीमियम भरता येतो. तसेच दीर्घकालीन लाभ मिळवण्याची सुविधा या योजनेत मिळते. त्यामुळे मोठ्या आर्थिक नियोजनासाठी ही योजना बेस्ट आहे.
तुम्ही रिटायरमेंटनंतर ठरावीक रक्कम हवी असेल तर ही योजना बेस्ट आहे. याचा प्रीमियम भरण्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीधारकाला दरवर्षी नियमित उत्पन्न मिळतं. याशिवाय आयुष्यभर विमा संरक्षणाचा लाभ घेता येतो. त्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी अनेक जण या योजनेची निवड करतात.
मुलांच्या शिक्षण आणि भविष्यातील खर्चासाठी LIC जीवन तरुण ही योजना विशेष तयार करण्यात आली आहे. पॉलिसीच्या कालावधीत रोजची बचत करता येते आणि मुलाच्या उच्च शिक्षणासाठी किंवा इतर महत्त्वाच्या गरजांसाठी मोठी आर्थिक मदत मिळू शकते. मॅच्युरिटीवेळी बोनससह एकरकमी रक्कमही दिली जाते. गुंतवणूक करण्याआधी संबंधित योजनेच्या सर्व अटी, लाभ आणि जोखीम यांची माहिती घ्या.
तुम्ही कमी बजेटमध्येही या योजनांमधून दीर्घकालीन मोठा निधी तयार करता येतो. दररोज ₹45 म्हणजेच महिन्याला सुमारे ₹1,358 इतकी बचत करून गुंतवणुकीची सुरुवात करता येते. नियमित गुंतवणूक आणि दीर्घकालीन कालावधीमुळे मॅच्युरिटीवेळी बोनससह ₹25 लाखांपर्यंतचा फंड मिळण्याची संधी असते.