Gold Rate Today Saam tv
बिझनेस

ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला कात्री; सोन्यानं गाठला नवा उच्चांक, चांदी झाली स्वस्त, वाचा लेटेस्ट दर

Gold Becomes Costly While Silver Slips: २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र, चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे.

Bhagyashree Kamble

२०२६ साली सोनं आणि चांदीच्या दराने चांगलाच उच्चांक गाठला. कधी घसरण तर, कधी सोन्याच्या भावाचा आलेख कायम चढताच राहिला. सध्या लग्नसराई सुरू आहे. लग्नसराईच्या मोसमात सोनं खरेदी हमखास केली जाते. मात्र, वाढत्या भावामुळे सोन्याचे दागिने खरेदी करावे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. सामान्यांच्या खिशाला निश्चितच झळ बसते. आज जर आपण सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्या खिशाला कात्री बसू शकते.

आज ५ डिसेंबर २०२५. सोन्याच्या दरानं आज उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २७० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२९,९३० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या भावात २,७०० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,९९,३०० रूपये मोजावे लागतील.

२४ सह २२ कॅरेट सोन्याच्या भावातही वाढ झालीये. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २५० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१९,१०० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या भावात २,५०० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,९१,००० रूपये मोजावे लागतील.

२४, २२ सह १८ कॅरेट सोन्याच्या भावातही कमालीची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २१० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९७,४५० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या भावात २,१०० रूपयांची वाढ झालीये. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,७४,५०० रूपये मोजावे लागतील.

सोन्याच्या भावात वाढ जरी झाली असली तरी, चांदीच्या दरात कमालीची घट झाली आहे. चांदीच्या भावात घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रूपयांची घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आपल्याला १८७ रूपये मोजावे लागतील. तर, १ किलो चांदीच्या दरात ४,००० रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,८७,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शीचे आमदार दिलीप सोपाल अजित पवारांच्या भेटीला

Beet Carrot Juice Benefits: आठवड्यातून ३ दिवस बीट-गाजर ज्यूस प्यायल्याने शरिरात कोणते आरोग्यदायी फायदे होतात?

मुंबई महापालिका निवडणूक होताच एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; निकालानंतर 29 नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम, कारण काय?

Diet Pohe: वजन कमी करायचंय? मग डाएटमध्ये अशापद्धतीने खा पोहे खा, नोट करा रेसिपीच्या टिप्स

भाजपची ताकद वाढली; राऊतांचा शेकडो शिवसैनिकांसह प्रवेश, बदलापुरातील राजकीय समीकरण बदललं

SCROLL FOR NEXT