आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोनं ₹९९,००० आणि २२ कॅरेट ₹९१,४०० दराने विकले जात आहे.
चांदी ₹१,१२,९०० प्रति किलो झाली असून ₹२००० स्वस्त झाली आहे.
सोन्याच्या दरात झालेली घट खरेदीदारांसाठी मोठा दिलासा आहे.
भारतात सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजार, कर, आणि विनिमय दरांवर ठरतो.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी दर वाढतोय, तर कधी घसरण होतेय. आज मात्र सोनं स्वस्त झालं असून, खरेदीदारांसाठी ही आनंददायक बाब ठरली आहे. आज सोनं स्वस्त झाले आहे. कालच्या तुलनेत आज १० ग्रॅम सोनं २५० रूपयांनी स्वस्त झाले आहे.
आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,००० इतका आहे. तर, २२ कॅरेटसोन्याची किंमत ९१,४०० रूपये आहे. कालच्या तुलनेत आज सोनं तब्बल ₹२५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्याही दरात घट झाली असून, आज चांदी ₹१,१२,९०० प्रति किलो दराने विकली जात आहे. चांदीचा दर तब्बल ₹२,००० रुपयांनी घसरला आहे.
दिल्लीमध्ये २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९९,९६० इतकी आहे. तर, २२ कॅरेट सोन्याची किंमत ९१,६४० इतकी आहे. मुंबईत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९९,९६० इतकी आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,४९० इतका आहे. इतर शहरांमध्ये सोन्याचा भाव याच दरांमभोवती आहे. यात विशेष बदल नाही. सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
भारतात सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?
सोन्याची किंमत आतंरराष्ट्रीय बाजारातील दर, आयात शुल्क आणि कर, रूपया आणि डॉलरमधील विनिमय दर, मागणी आणि पुरवठ्याचा समतोल या आधारावर निश्चित केली जाते. भारतात सोन्याचा वापर केवळ गुंतवणुकीसाठी नसून, लग्न आणि सणांमध्येगी केला जातो. त्यामुळे किंमतीतील बदलांचा थेट परिणार खरेदीदारांच्या खिशावर होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.