सोन्याच्या दरात मागील ४ दिवसांपासून घट झाली आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने आता सोने खरेदी करण्यासाठी उत्तम संधी आहे. चार दिवसात जवळपास सोन्याच्या दरात २००० रुपयांची घसरण झालेली आहे. आजदेखील या दरात घसरण झाली आहे. प्रति तोळ्यामागे ५० रुपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळा १,०१,३५० रुपये आहेत.
सोन्याच्या दरात घसरण (Gold Rate Fall Today)
आज सोन्याचे दर घसरले आहेत. १८,२२ आणि २४ कॅरेटच्या दरात घसरण झाली आहे. प्रति तोळ्यामागे ५० रुपये तर १० तोळ्यामागे ५०० रुपयांची घसरण झाली आहे. सलग तीन दिवस ही घसरण होत आहे. रक्षाबंधनानंतर सोन्याला उतरती कळा लागली आहे. दरम्यान, सोन्याचे दर स्थिर नसतात. सतत वाढत असतात. त्यामुळे आता सोन्याचे दर कमी झाले तर लगेच सोने खरेदी करा. हीच उत्तम संधी आहे.
सोन्याचे दर (Today Gold Rate)
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,०१,३५० रुपये आहेत. या दरात ५० रुपयांची घसरण झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर १०,१३,५०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे र ८१,०८० रुपये आहेत.
२२ कॅरेट सोनं (22k Gold Rate)
२२ कॅरेट सोन्याचे दरदेखील घसरले आहे. २४ कॅरेटप्रमाणेच या दरात ५० रुपयांची घसरण झाली आहे. आज १० ग्रॅम सोन्याची किंमत ९२,९०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७४,३२० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,२९,००० रुपये आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)
आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ४० रुपयांनी घसरले आहेच. हे दर ७६,०१० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७,६०,१०० रुपये झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.