गेल्या काही दिवसांमध्ये सुवर्ण बाजारपेठेत जूनच्या संपूर्ण महिन्यात सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ- उतार पाहायला मिळाले. पण जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जुलै रोजी सोनं-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक सुवर्ण बाजारपेठेसह मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील सुरुवातीच्या व्यवहारातही सोनं-चांदीच्या किंमती घसरल्याचं दिसून आले आहे.
जळगावच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,४०,००० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,२८,२४० रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. चांदीचा दर प्रतिकिलो २,२५,००० रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात २ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात अडीच हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे विवाहसोहळे, सण-उत्सव किंवा गुंतवणुकीसाठी सोने - चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरणार आहे.
दरम्यान Goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १,२६० रुपयांची घसरण झाली आहे.त्याची किंमत १,४०,७८० रुपये झाली आहे. तर १० तोळे २४ कॅरेट सोन्यासाठी १४,०७,८०० रुपये मोजावे लागणार आहेत.
२२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १,१५० रुपयांची घसरण झाली असून त्याची किंमत १,२९,०५० रुपये झाली आहे. तसेच १० तोळे २२ कॅरेट सोन्यासाठी १२,९०,५०० रुपये खर्च करावे लागतील.
तसेच १८ कॅरेट सोन्याच्या दरातही ९४० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे १ तोळा १८ कॅरेट सोन्याची किंमत १,०५,५९० रुपये, तर १० तोळ्यांसाठी १०,५५,९०० रुपये मोजावे लागतील. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या हालचाली डॉलरच्या मूल्यातला बदल आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारातले ताजे दर तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.