सध्या बाजारात एसयूव्ही कारचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. मात्र तरीही छोट्या हॅचबॅक कारला बाजारात मोठी मागणी आहे. यातच आपण आज अशा काही हॅचबॅक कार्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
मारुती सुझुकी बलेनो
मारुती बलेनोला 1.2-लिटर, चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते. जे 88bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. याच्या ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल युनिट आणि AMT गिअरबॉक्सचा समावेश आहे. हे इंजिन नवीन BS6 स्टेज 2 उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी अपडेटेड करण्यात आले आहे. मारुती बलेनोची एक्स-शोरूम किंमत 6.61 लाख ते 9.88 लाख रुपये आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ह्युंदाई आय20
नवीन Hyundai i20 ला पॉवर देण्यासाठी 1.2-लिटर, चार-सिलेंडर, एनए पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 82bhp ची कमाल पॉवर आणि 115Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल युनिट किंवा IVT युनिटसह जोडलेले आहे. Hyundai i20 ची एक्स-शोरूम किंमत 7.04 लाख ते 11.21 लाख रुपये आहे. (Latest Marathi News)
टाटा अल्ट्रोझ
Tata Altroz साठी इंजिन पर्यायांमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन, 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन समाविष्ट आहे. ज्यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल युनिट स्टँडर्ड आहे. तर DCA ट्रान्समिशन फक्त काही प्रकारांसाठी उपलब्ध आहे. यात सीएनजी प्रकारही उपलब्ध आहे. ही सर्व इंजिने RDE आणि BS6 स्टेज 2 उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी अपडेटड करण्यात आली आहेत. Tata Altroz ची एक्स-शोरूम किंमत 6.60 लाख ते 10.74 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
टाटा टियागो ईव्ही
यात दोन बॅटरी पॅकचा पर्याय उपलब्ध आहे. 19.2kWh आणि 24kWh, जे अनुक्रमे 250km आणि 315km च्या रेंजसह येतात. याचे आउटपुट अनुक्रमे 60bhp/110nm आणि 74bhp/114nm आहेत. Tiago EV मध्ये 3.3kW किंवा 7.2kW चे होम चार्जर आहे. जे गाडीच्या प्रकारावर अवलंबून आहे. डीसी फास्ट चार्जिंगसह ही कार 57 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते. Tata Tiago EV ची एक्स-शोरूम किंमत 8.69 लाख ते 12.04 लाख रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.