Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ठाण्याचा लेक झाला IPS; २२व्या वर्षी क्रॅक केली UPSC; अभिजित पाटील यांचा प्रवास

Success Story of IPS Abhjeet Patil: यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. ठाण्याच्या अभिजित पाटील यांनी फक्त २२व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास केली आहे.

Siddhi Hande

आयपीएस अभिजित पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास

२२ व्या वर्ष क्रॅक केली UPSC

ठाण्याच्या लेकाची यशोगाथा

यूपीएससी परीक्षा ही खूप अवघड असते. दरवर्षी लाखो लोक परीक्षा देतात.यातील अनेकजण आयएएस, आयपीएस अधिकारी होतात.असेच स्वप्न अभिजित पाटील यांनी पाहिलं. त्यांनी स्वप्न पूर्णदेखील केले.त्यांनी २२व्या यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

अभिजित पाटील हे मूळचे ठाण्याचे. त्यांचा जन्म ११ जून १९९१ रोजी झाला. त्यांन बी.टेकचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केल. त्यांनी अभ्यास केला. २०२२ च्या परीक्षेत त्यांनी ४७०वी रँक प्राप्त केली आहे. ते देशातील सर्वात करुण आयपीएस अधिकारी झाले आहेत.

अभिजित पाटील यांनी खूप कमी वयात हे यश मिळवले आहे. ते सर्वात तरुण अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांचे वडील मुंबई महानगरपालिकेत मुख्य लेखापरीक्षक होते. त्यांची आई सिंचन विभागात कार्यरत होते. ते दोघेही सध्या ठाण्याला राहतात.

अभिजित हे मूळचे महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. अभिजित यांनी लहानपणापासूनच सिविल सर्व्हिसचचे स्वप्न मनाशी बाळगले होते. त्यांनी शेवटच्या वर्षातच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

मेहनत, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही कोणतेही यश मिळवू शकतात. फक्त तुम्ही अभ्यास करा तुम्ही यूपीएससीसारख्या परीक्षा पास करु शकतात. अभ्यास करताना शिस्त आणि वेळेचे नियोजन केल्यावर यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT