Telecom Service Rule Google
बिझनेस

Telecom Services Rule: तुमचा कॉल किंवा इंटनेट सेवा बंद झाली तर तुम्हाला मिळू शकते नुकसान भरपाई; काय आहे नवा नियम?

Telecom Service New Rule: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने टेलिकॉम सर्व्हिससाठी नवे नियम लागू केले आहेत. आता जर टेलिकॉम सर्व्हिसेस काही कालावधीसाठी बंद झाली तर कंपनीला ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

Siddhi Hande

मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.आता मोबाईल सर्व्हिस बंद केल्यानंतर कंपनीला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच मोबाईल सर्व्हिसबाबत नवीन नियम लागू करणार आहे. TRAI ने जारी केलेल्या नियमांनुसार, टेलिकॉम ऑपरेटर्संना जिल्हा स्तरावर २४ तासांपेक्षा जास्त वेळ सेवा बंद झाल्यास ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे.

TRAI च्या नवीन नियमांनुसार, जर टेलिकॉम कंपनी आपले क्वालिटी बेंचमार्क पूर्ण करण्यास यशस्वी ठरली तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. हा दंड ५०,००० रुपयांवरुन १ लाख रुपये करणार आहे. सहा महिन्यांनंतर हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत.

रेगुलेटर ने रिवाइज्ड रेग्युलेशन- द स्टँडर्ड ऑफ क्वालिटी ऑफ सर्व्हिस ऑफ अॅक्सेस अँड ब्रॉडबँड सर्विस रेगुलेशन, २०२४ अंतर्गत तुम्ही या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला ५ ते १० लाख रुपये दंड भरावा लागेल.

नवीन नियम मुलभूत आणि सेल्युलर मोबाइल सेवा, ब्रॉडबँड सेवा आणि ब्रॉडबँड वायरलेस सेवांसाठी हे नवीन नियम लागू करण्यात आले आहे. एखाद्या जिल्ह्यात नेटवर्क आउटेज झाल्यास, टेलिकॉम ऑपरेटर्संना ग्राहकांच्या भाड्यात सवलत द्यावी लागणार आहे. नवीन नियमांनुसार, टेलिकॉम ऑपरेटर्संना प्रीपेड ग्राहकांसाठी वैधता वाढवावी लागेल.

हा नियम ब्रॉडबँड सर्व्हिस प्रोवाइडर्ससाठीदेखील लागू होणार

फिक्स्ड लाइन सर्व्हिस प्रोवाइडर्संना पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांनादेखील दंड भरावा लागणार आहे. या दंडाची रक्कम त्यांना ग्राहकांना द्यावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

SCROLL FOR NEXT