Telecom department’s new rule: Caller’s name to appear on mobile screens to prevent fraud and spam calls. saam tv
बिझनेस

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Caller Identification : आता सर्व मोबाईलधारकांसाठी महत्त्वाची बातमी.निनावी कॉल्समुळे सारेच जण हैराण असतात. मात्र आता अशा कॉल्सचं टेंशन दूर होणार आहे. कारण फोन करणाऱ्या अज्ञाताचं नावच तुमच्या मोबाईल झळकणार आहे. हे कधी आणि कसं होणार यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Girish Nikam

  • दूरसंचार विभागानं निनावी कॉल्स रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

  • मोबाईलवर नंबरसोबत कॉल करणाऱ्याचं नाव दिसेल.

  • फसवणूक, स्पॅम कॉल्स रोखले जाणार

आजपर्यंत अज्ञात नंबरवरून फोन आल्यास तुमच्या मोबाईल स्क्रीनवर फक्त अंक दिसत होते. पण आता हे बदलणार आहे. दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना फसवणूक रोखण्यासाठी नंबरसह कॉल करणाऱ्याचे नाव दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. आता असे झाल्यास काय होऊ शकते? हे पाहुयात.

फोन वाजेल्यानंतर आता कॉलरचे नाव दिसणार. त्यामुळे ट्रू कॉलर सारख्यां इतर मोबाईल अॅपची गरज ग्राहकांना भासणार नाही. यामुळे डिजिटल आणि आर्थिक घोटाळ्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे. कारण गंडा घालणाऱ्याचं बिंग आता लगेचच फुटणार आहे. मात्र याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना सध्या एका आठवड्यात एका भागात ही सुविधा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर दोन महिन्यांनी ही सेवा संपूर्ण देशभरात लागू करण्यात येणार आहे.

मात्र यातून काही सरकारी संस्था आणि व्यावसायिकांना यातून सूट देण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी CLIR (Calling Line Identification Restriction) ची निवड केली आहे, त्यांचे नाव संरक्षित राहील. यात प्रामुख्याने गुप्तचर अधिकारी आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. ही सूट बल्क कनेक्शन, कॉल सेंटर्स किंवा टेली-मार्केटर्सना मिळणार नाही. याबाबत सायबर तज्ञांशी आम्ही बातचीत केलीय.. ते काय म्हणालेत पाहूया.

आपल्या सर्वांसाठी हा बदल स्वागतार्ह आहे. मात्र ही सेवा नेमकी केव्हापासून सुरू होणार आणि याचा गुन्हेगारी रोखण्यात कितपत फायदा होणार? हे पाहणं महत्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT