Google Audio Emoji Saam Tv
बिझनेस

Google Audio Emoji: फोनवर बोलणं होईल आणखी मजेशीर, गुगलने आणलंय नवीन ऑडिओ इमोजी फीचर; कसा करायचा वापर?

Priya More

गुगल (Google) आपल्या युजर्ससाठी प्रत्येक वेळी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतो. सध्या गुगल आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर घेऊ येत आहे. या फीचरचा वापर कॉलिंगदरम्यान होणार आहे. यामध्ये युजर्सला कॉल सुरू असताना इमोजीद्वारे आपले रिअॅक्शन देण्याची सुविधा मिळणार आहे. या फीचरवर सध्या टेस्टिंग सुरू आहे. तर येणाऱ्या आठवड्यामध्ये युजर्ससाठी हे फीचर रोलआऊट केले जाऊ शकते.

गुगल आता तुमचे मोबाईलवरील संभाषण आणखी मजेदार बनवणार आहे. यासाठी गुगल त्यांच्या फोन ॲपमध्ये 'ऑडिओ इमोजी' नावाचे एक नवीन फीचर घेऊ येत आहे. 9to5Google ने दिलेल्या रिपोर्टनुसार, Android वापरकर्ते फोन कॉल दरम्यान सहा प्रकारचे साऊंड प्ले करू शकतील. हे साऊंड उदास (Sad), टाळ्या (applause), उत्साह (celebration), हसणे (Laugh), ढोलकीचा आवाज (Drumroll) आणि पूप (Poop) या​​सारखे असतील. 'ऑडिओ इमोजी' फीचर सर्वात आधी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिसले होते. तेव्हा त्याला साउंड रिएक्शन असे म्हटले जात होते.

गुगल हे फीचर आपल्या युजर्ससाठी लवकरच आणू शकते. यामध्ये कॉलिंग दरम्यान इमोजीद्वारे प्रतिक्रिया देण्याची सुविधा असेल. यामध्ये Sad, Applause, Celebrate, Laugh, Drumroll आणि Poop यांचा समावेश आहे. जर तुम्हाला कॉल आला तर तुम्ही या इमोजींद्वारे प्रतिक्रिया देऊ शकाल. या फीचरचे नाव साउंड रिॲक्शन आहे. विशेष म्हणजे या इमोजींद्वारे आवाज तयार केला जाईल. कॉलर आणि रिसीव्हर दोघेही ते ऐकू शकतील.

तुमच्या फोनमध्ये टेस्टिंग व्हर्जन असेल तर ते वापरण्याचा सोपा मार्ग आहे. सर्व प्रथम तुम्हाला मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि नंतर जनरल सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर ऑडिओ इमोजी शोधा आणि त्यावर टॅप करा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक फ्लोटिंग इमोजी दिसेल. जे तुम्ही कॉलिंग दरम्यान वापरू शकाल.

एकदा तुम्ही फीचर चालू केल्यानंतर तुम्ही एखाद्याला कॉल करत असताना स्क्रीनवर एक फ्लोटिंग बटण दिसेल जे तुम्हाला व्हॉइस इमोजी पाठवून देते. तुम्ही 'ऑडिओ इमोजी वापरून पहा' वर टॅप करा आणि दिसणारे कोणतेही इमोजी निवडा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. हे वैशिष्ट्य फक्त स्पीकर मोडमध्ये कार्य करते. तसेच, दोन साऊंड इमोजी पाठवण्यामध्ये थोडे अंतर आहे जेणेकरून आपण ते वारंवार वापरू शकत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT