Godrej Family Tree : गोदरेज समुहात विभाजन, आता कोण सांभाळणार व्यवसाय? वाटणीत कोणाला काय मिळालं?

Split into Godrej Group : सध्या गोदरेज कंपनीची वॅल्यू २.३४ लाख करोड रुपये इतकी आहे. अशात आता दोन वेगवेगळ्या गटांमध्ये या कंपनीची वाटणी होणार आहे. या वाटणीला परिवारातील सर्व सदस्यांनी मान्यता देखील दिली आहे.
Godrej Family Tree
Godrej Family TreeSaam TV
Published On

गोदरेज ही फार जुनी कंपनी आहे. आज प्रत्येक व्यक्तीला या कंपनीबाबत माहिती आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही या कंपनीचा वित्सार झाला आहे. देश स्वातंत्र्य होण्याआधीपासून ही कंपनी मार्केटमध्ये काम करत आहे. गोदरेज कंपनीची स्थापना १२७ वर्षांपूर्वी झालीये. फक्त दोन व्यक्तींनी या कंपनीची सुरुवात केली.

Godrej Family Tree
Rural Business Idea In Marathi: गावात सुरु करा हटके व्यवसाय; दिवसाला कराल हजारो रुपयांची कमाई, जाणून घ्या भन्नाट आयडिया

सध्या गोदरेज कंपनीची वॅल्यू २.३४ लाख करोड रुपये इतकी आहे. अशात आता दोन वेगवेगळ्या गटांमध्ये या कंपनीची वाटणी होणार आहे. या वाटणीला परिवारातील सर्व सदस्यांनी मान्यता देखील दिली आहे. त्यामुळे आता वाटनीनंतर कुणाला कोणती कंपनी मिळणार याबाबत जाणून घेऊ.

गोदरेज कुटुंबातील सदस्य

गोदरेज कंपनी साल १८९७ मध्ये स्थापन झाली. अर्देशिर गोदरेज आणि पिरोजशाह हे दोघेही मिळून ही कंपनी चावत होते. अर्देशिर गोदरेज यांना मुलं नव्हती त्यामुळे कंपनीची जबाबदारी पिरोजशाह यांच्या मुलांवर आली. सोहरब, दोसा, बुरजोर आणि नवल यांनी गोदरेज कंपनी संभाळली.

पिरोजशाहच्या मुलांच्या मृत्यूनंतर, कंपनीची जबाबदारी बुरजोरची मुलं आदि आणि नादिर गोदरेज तसेच नवलची मुलं जमशेद आणि स्मिता, दोसाचा मुलगा रिशाद यांच्यावर आली. आता या पाचही जणांनी पुन्हा एकदा गोदरेज ग्रुपच्या विभाजनाला मान्यता दिली आहे.

कुणाकडे कोणती जबाबदारी

आदि गोदरेज गोदरेज समूहाचे अध्यक्ष आहेत.

गोदरेज इंडस्ट्रीज आणि गोदरेज ॲग्रोव्हेटचे नादिर गोदरेज हे अध्यक्ष आहेत.

जमशेद गोदरेज अँड बॉयसमध्ये पार्टनर आहेत.

गोदरेजच्या कोणत्याही कंपनीची औपचारिक जबाबदारी रिशाद यांच्याकडे आहे.

गोदरेजची पुढील पिढी

आदि गोदरेज यांना तान्या, निस्बा या दोन मुली आहेत आणि मुलाचं नाव पिरोजशाह असं आहे.

सोहराब, बुर्जिस आणि होर्मजद अशी नादिर गोदरेज यांच्या मुलांची नावे आहेत.

जमशेद गोदरेज यांना रायका आणि नवरोज ही दोन मुले आहेत.

स्मिता यांना फ्रायन आणि नायरिका या दोन मुली आहेत.

ऋषद गोदरेज यांचे लग्न झालेले नाही.

Godrej Family Tree
Smart Businesses Ideas: घरबसल्या होईल बम्पर कमाई; कमी बजेटमध्ये करता येणारे व्यवसाय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com