Realme C63 5G Launch Saam Tv
बिझनेस

Realme C63 5G Launch : १० हजारांपेक्षा कमी किंमत, रिअलमीचा नवा स्मार्टफोन, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स!

Buy Realme New Smartphone: रिअलमी कंपनीने आपल्या सी सीरीजमध्ये 'Realme C63 5G' हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत आणला आहे.

Priya More

१० हजारांपेक्षा कमी किंमतीचा आणि नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रिअलमी कंपनीने आपल्या सी सीरीजमध्ये 'Realme C63 5G' हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत आणला आहे. हा स्मार्टफोन फॉरेस्ट ग्रीन आणि स्टाररी गोल्ड या दोन कलर्सच्या पर्यायांमध्ये आणण्यात आले आहेत. 'Realme C63 5G' हा स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वीच कंपनीने माहिती दिली होती की हा फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरसह मार्केटमध्ये आणला जात आहे. जर तुम्ही बजेट स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

Realmeचा हा स्मार्टफोन Octa Core MediaTek Dimensity 6300 6nm प्रोसेसर (2x Cortex-A76 @ 2.4GHz 6x Cortex-A55 @ 2GHz) आणि Arm Mali-G57 MC2 GPU सह मार्केटमध्ये आणण्यात आला आहे. रिअलमीचा हा स्मार्टफोन 4GB / 6GB / 8GB LPDDR4x रॅमसह येतो. हा स्मार्टफोन 128 GB (UFS 2.2) स्टोरेजसह मार्केटमध्ये आणण्यात आला आहे. स्मार्टफोन मायक्रोएसडी कार्डसह 2TB पर्यंत एक्सपेंडेबल मेमरीसह येतो.

नुकताच लॉन्च करण्यात आलेला Realme स्मार्टफोन 6.67 इंच, 1604 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन, HD + स्क्रीन, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 625 nits पीक ब्राइटनेससह येतो. हा स्मार्टफोन 50/60/90/120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेटसह येतो. हा 5G स्मार्टफोन Galaxycore GC32E1 सेन्सर आणि LED फ्लॅशसह 32MP रियर कॅमेरासह येतो. या स्मार्टफोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Realme C63 5G स्मार्टफोनमध्ये कंपनी 5000mAh बॅटरी आणि 10W क्विक चार्ज दिला आहे.

Realme फोन Android 14 वर realme UI 5.0 सह चालतो. स्मार्टफोन 3.5mm ऑडिओ जॅक, 1115 अल्ट्रा लिनियर बॉटम पोर्टेड स्पीकर, ब्लूटूथ 5.3, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. Realme C63 5G हा स्मार्टफोन 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे.

4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 1000 रुपयांच्या सूटमध्ये खरेदी करता येईल. डिस्काउंटनंतर हा स्मार्टफोन 9999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. Realme C63 5G ची पहिली विक्री 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता थेट होईल. ग्राहकांना हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT