TCS Saam Tv
बिझनेस

TCS कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! वर्षभरात २४००० कर्मचारी घटले; नेमकं कारण काय?

TCS Headcount down by 24000 Employees: टीसीएस कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास २४,००० कर्मचारी कमी झाले आहेत. कंपनीने पॉलिसीत पुनर्रचना केली आहे.

Siddhi Hande

टीसीएस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास २४००० कर्मचारी घटले

कर्मचारी कपातीचे कारण काय?

भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सीमध्ये जवळपास २४००० कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे . कंपनीच्या चौथ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांची संख्या ५,८४,१९ आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास २३,४६०ने कमी आहे. म्हणजेच एवढ्या कर्मचाऱ्यांची संख्या कंपनीतून कमी झाली आहे.

याबाबत सीएचआरओचे सुदीप कुन्नुमल यांनी माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या संख्येतील ही घट गेल्या वर्षीच्या पुनर्रचनेमुळे झालेली आहे. कंपनीने आतापर्यंत २५,००० कॅम्प्स ऑफर्स दिल्या आहेत. दरवर्षी ४०००० फ्रेशर्सची भरती करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. मागच्या वर्षी २५,००० कॅम्प्स ऑफर्स दिल्या आहेत. टीसीएसने याचसोबत अनुभवी उमेदवारांनाही संधी दिली आहे.

टीसीएसने कर्मचारी कपात पूर्ण झाल्याचेही जाहीर केले आहे. कंपनी गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्के कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याचे सांगितले आहे. बेंच पॉलिसी अधिक कठोर करणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे अनेक मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला होता. आता पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असं निवेदनात म्हटले आहे.

कंपनीवर काय होणार परिणाम?

मागच्या वर्षी कंपनीने ४४,००० ट्रेनी पदांसाठी भरती केली आहे. कॅमप्स प्लेसमेंटद्वारे अनेक तरुणांना नोकरीची संधी दिली आहे.यामुळे आयटी आणि इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्रमाणात नोकरी देणारी टीसीएस कंपनी बनली आहे. टीसीएस भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI),कंसल्टिंग आणि अॅडवायजरी अशा नवीन स्किल्सवर लक्ष देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT