Tax Saving Saam Tv
बिझनेस

Tax Saving: या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा, मिळेल टॅक्सपासून सूट आणि जास्तीत जास्त परतावा

Tax Saving Schemes Give High Return: तुम्ही काही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करुन टॅक्स वाचवू शकतात. याचसोबत तुम्हाला या योजनांवर भरघोस परतावादेखील मिळतो.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नुकतेच बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले. या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिसर फिक्स्ड डिपॉझिट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पब्लिक प्रोव्हिडंट फंडवरील व्याज सारखे आहे. यामधील गुंतवणूक ही कधीही फायद्याची असते. तसेच या योजनांमध्ये गुंतवणूकीवर चांगला परतावा तर मिळतोच परंतु टॅक्स बेनिफिटदेखील मिळते.

वित्तीय एक्सपर्टच्या म्हणण्यांनुसार, रेपो रेटमध्ये कपात झाल्यावर बँकांच्या योजनांवर मिळणार व्याजदरदेखील कमी होत आहेत. या योजनांवर सध्या व्याजदर स्थिर आहेत. परंतु हे कमी होऊ शकते. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कलम80C अंतर्गत सूट मिळते. तुम्हाला १.५ लाखांवर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.

बँक एफडीवर भरघोस परतावा (Bank FD)

नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट (५ वर्षे) (National Saving Time Deposite)

नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट योजनेत तुम्हाला ७.५ टक्के व्याज मिळते. या योजनेत तुम्ही कमीत कमी १००० रुपयांची गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात.

सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम (Senior Citizen Saving Scheme)

या योजनेत तुम्हाला ८.२ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना व्याजदर मिळते. या योजनेत तुम्हाला टॅक्स बेनिफिटदेखील मिळतात.

पीपीएफ (PPF)

पीपीएफ ही गुंतवणूकीसाठी आणि टॅक्स वाचवण्यासाठी बेस्ट आहे. या योजनेत तुम्हाला वर्षाला कमीत कमी ५०० आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवावे लागतील. यावर ७.१ टक्के व्याजदर मिळते. याची मॅच्युरिटी १५ वर्षांची आहे.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजनेत ८.२ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत १० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयोगटातील मुलींच्या नावाने अकाउंट ओपन करु शकतात. या योजनेत वर्षाला २५० ते १.५ लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेतील पैसे तुम्ही लेकीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी वापरु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार; विरोधकांचं टेन्शन वाढणार,VIDEO

Shukra Gochar 2025: पाच राशींचं नशीब पालटणार; छप्परफाड होणार कमाई, मिळणार प्रेम, घर, पैसा अन् गाडी

Lightning Strike : वीज कडाडली अन् झाला घात; बैल चारण्यासाठी गेलेल्या तरूणाचा मृत्यू, दोघे जखमी

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधन होण्याआधी लाडक्या बहिणींना झटका? महायुती सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Maharashtra Live News Update: पुण्यात मनसेचे आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन

SCROLL FOR NEXT