Tata Tiago surpasses 5 lakh unit sales milestone Saam Tv
बिझनेस

Tata Tiago Sales Milestone: टाटा टियागोची जबरदस्त कामगिरी, गाठला ५ लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्‍पा

Tata Tiago surpasses 5 lakh unit sales milestone: टाटा टियागोची जबरदस्त कामगिरी, गाठला ५ लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्‍पा

साम टिव्ही ब्युरो

Tata Tiago surpasses 5 lakh unit sales milestone: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने घोषणा केली की, टियागोने ५००,००० युनिट्सच्‍या विक्रीचा टप्‍पा गाठला आहे. शेवटच्‍या १ लाख युनिट्सची विकी अवघ्‍या १५ महिन्‍यांमध्‍ये झाली आहे.

टियागो श्रेणी पेट्रोल, सीएनजी व इलेक्ट्रिक अशा विविध पॉवरट्रेन पर्यायांमध्‍ये येते. तसेच टियागो एनआरजी एसयूव्‍ही प्रेरित डिझाइनसह ऑफ-रोडिंग क्षमतांसह येते. ही वेईकल देखील पेट्रोल व सीएनजी पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे. टियागोच्‍या नेट प्रमोटर स्‍कोअरला ५१ चे सर्वोच्‍च रेटिंग मिळाले आहे.

याबाबत बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि.चे विपणन प्रमुख विनय पंत म्‍हणाले, ‘‘टियागोने लॉन्च झाल्‍यापासून आमच्‍या न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणीच्‍या लोकप्रियतेला चालना देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टियागोने सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांना उत्तम स्‍टाइलिंग, अद्वितीय सुरक्षितता मानक, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान देत, तसेच हॅच विभागाला नवीन आकार देत सतत अपेक्षांची पूर्तता केली आहे.''  (Latest Marathi News)

ते म्हणले, ''५०० हजार विक्रीचा टप्‍पा गाठण्‍यामधून टाटा मोटर्सची सर्वोत्तमतेप्रती अविरत कटिबद्धता सार्थ ठरते. आम्‍ही सतत पाठिंबा देणाऱ्या आमच्‍या निष्‍ठावान ग्राहकांचे मनापासून आभार मानतो. आम्‍हाला विश्‍वास आहे की टियागो न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणीच्‍या यशामध्‍ये, तसेच विभागाच्‍या विकासामध्‍ये महत्त्वपूर्ण योगदान देईल.’’  (Latest Auto News in Marathi)

टियागो ग्राहकांच्‍या प्रोफाइलमधून तरूण व महत्त्वाकांक्षी व्‍यक्‍तींप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते, जेथे ग्राहकाचे सरासरी वय ३५ वर्ष आहे. टियागोची ६० टक्‍के विक्री शहरी बाजारपेठांमधून आहे आणि उर्वरित ४० टक्‍के विक्री ग्रामीण बाजारपेठांमधून आहे. यामधून विविध ग्राहक विभागांमध्‍ये वेईकलची व्‍यापक आकर्षकता दिसून येते.

टियागोने महिला ग्राहकांमध्‍ये देखील सकारात्‍मक बदल पाहिला आहे, जेथे जवळपास १० टक्‍के विक्रीमध्‍ये महिला ग्राहक आहेत. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे टियागोला पहिल्‍यांदाच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून व्‍यापक लोकप्रियता मिळाली आहे, जेथे आर्थिक वर्ष २३ मध्‍ये पहिल्‍यांदाच कार खरेदी केलेल्‍या ग्राहकांमध्‍ये टियागो खरेदी केलेले ग्राहक ७१ टक्‍के आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT