Tata Nexon EV Saam Tv
बिझनेस

Tata Motors: बूक करा टाटा मोटर्संच्या 'या' कार; मिळतेय १.२० लाखांची भरघोस सूट

Tata Motors Reduce Prices: टाटा मोटर्सने ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्सने आपल्या इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने जवळपास १.२० लाखांची सूट काही कारवर दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tata Motors Reduce Prices OF Electric Vehicles:

टाटा मोटर्स ही देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. कंपनीने आपल्या कारमध्ये जवळपास १.२० लाख रुपये किंमत कमी केली आहे. तुम्ही जर कार घ्यायचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. (latest News)

Tata Nexon EV

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, कंपवीने Nexon.ev या इलेक्ट्रिक कारची किंमत १.२० लाख रुपयांनी कमी केली आहे. ग्राहक Nexon Electric कारचे बेस व्हर्जन १४.४९ लाख रुपयांत खरेदी करु शकतात. तर Nexon.ev ची लाँग रेंज व्हर्जन १६.९९ लाख रुपयांना खरेदी करु शकतात.

Tiago EV

एका रिपोर्टनुसार, टाटाची इलेक्ट्रिक कार Tiago EV च्या बेस मॉडेलमध्ये ७० हजार रुपयांनी कपात करण्यात आली आहे. कंपनीच्या या कारची किंमत ७.९९ लाख रुपये झाली आहे.

कंपनीच्या कपातीबाबत TPEM चे मुख्य व्यावसायिक अधिकारी विवेक श्रीवत्स यांनी माहिती दिली. बॅटरीचा खर्च हा इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीचा सर्वात मोठा भाग असतो. अलीकडच्या काळात बॅटरी सेलच्या किमती कमी झाल्या आहेत. त्या भविष्यातही तशाच राहतील. याचा लाभ ग्राहकांना मिळावा यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहने अधिक सुलभ होण्यासाठी प्रयत्न करणे हे आमचे ध्येय आहे. आमचा पोर्टफोलिओ आमच्या स्मार्ट फीचरसह समृद्ध झाला आहे. आम्हाला विश्वास आहे की Nexon.ev आणि Tiago.ev ग्राहकांना जास्त प्रमाणात आकर्षित करतील, असेही त्यांनी सांगितले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून महागड्या दुचाकीच्या स्पीडो मीटरची चोरी

Politics : बडा खेला हो गया! मतदानाच्या आदल्या दिवशीच मोठा गेम; 'जन सुराज'च्या नेत्याचा उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश

Mangal Shukra Yuti 2025: 18 महिन्यांनी बनणार मंगळ-शुक्राचा संयोग; 'या' ३ राशींच्या नशीबी पैसाच पैसा

Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT