Festival Of Cars Saam Tv
बिझनेस

Festival Of Cars: टाटा मोटर्सकडून एसयूव्‍हींसाठी 'फेस्टिवल ऑफ कार्स' लाँच, कमी किमतीत मिळतील आवडत्या कार्स

Shreya Maskar

टाटा मोटर्स ही देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. टाटा मोटर्सकडून सध्या फेस्टिव्हल ऑफ कार्स लाँच करण्यात आले आहे. यामध्ये टाटा मोटर्सच्या अनेक कारवर आकर्षक ऑफर मिळणार आहे. खास सणासुदीच्या काळात आयसी वेईकल्सच्या किंमतीमध्ये २.०५ लाख रुपयांची घट होते. पेट्रोल डिझेल सीएनजीवर चालणाऱ्या सर्व एसयूव्ही आणि कारवर विशेष किंमती ऑफर करण्यात आल्या आहे.

लोकप्रिय मॉडेल्ससाठी कारच्या किंमती

  • ४.९९ लाख रूपयांमध्‍ये टिएगो

  • ६.४९ लाख रूपयांमध्‍ये अल्‍ट्रोज

  • ७.९९ लाख रूपयांमध्‍ये नेक्‍सॉन

  • १४.९९ लाख रूपयांमध्‍ये हॅरियर

  • १५.४९ लाख रूपयांमध्‍ये सफारी

टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने यंदा सणासुदीच्‍या काळासाठी अद्भुत ऑफर्ससह आतापर्यंतचा सर्वात मोठा 'फेस्टिवल ऑफ कार्स' लाँच केला आहे. कंपनीच्‍या लोकप्रिय कार्स व एसयूव्‍हींसाठी अभूतपूर्व किमती आणि आमच्‍या शोरूम्‍समध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या अतिरिक्‍त ग्राहक फायद्यांच्‍या बकेटसह ग्राहक एकूण जवळपास २.०५ लाख रूपयांच्‍या फायद्यांचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामुळे स्‍वप्‍नवत किमतींसह स्‍वप्‍नवत कार खरेदी करण्‍यासाठी ग्राहकांकरिता परिपूर्ण संधी आहे. स्‍पेशल, फेस्टिव्‍ह ऑफर्स पेट्रोल, डिझेल व सीएनजीवर चालणाऱ्या सर्व कार्स आणि एसयूव्‍हींवर ३१ ऑक्‍टोबर २०२४ पर्यंत मर्यादित कालावधीकरिता उपलब्‍ध आहेत.

फेस्टिवल ऑफ कार्सची घोषणा करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ''सणासुदीचा काळ सुरू होत असताना आम्‍हाला बहुमूल्‍य ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची भव्‍य श्रेणी सादर करण्‍याचा आनंद होत आहे. आयसीई वेईकल्‍सवर जवळपास २.०५ लाख रूपयांच्‍या एकूण फायद्यांसह यंदाच्‍या फेस्टिव्‍ह साजरीकरणामध्‍ये मर्यादित कालावधीसाठी आकर्षक किंमत कपात, तसेच आकर्षक एक्‍स्‍चेंज व रोख फायद्यांचा समावेश आहे, ज्‍यामुळे हा नवीन शुभारंभाच्‍या उत्‍साहाला साजरे करण्‍याचा परिपूर्ण क्षण आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, ग्राहक टाटा कारचे मालक बनण्‍याच्‍या या संधीचा आनंद घेतील, घरामध्‍ये सर्वोत्तम सुरक्षितता व डिझाइनने युक्‍त कार आणतील आणि यंदाच्‍या सणासुदीच्‍या काळाला अत्‍यंत खास करतील.

  • टिएगो ४,९९,९०० ६५,०००

  • टिगोर ५,९९,९०० ३०,०००

  • अल्‍ट्रोज ६,४९,९०० ४५,०००

  • नेक्‍सॉन ७,९९,९९० ८०,०००

  • हॅरियर १४,९९,००० १,६०,०००

  • सफारी १५,४९,००० १,८०,०००

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

Mumbai News : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

Viral News: शाब्बास पठ्ठ्यांनो! कपडे शिलाईसाठी तरुणांचा हटके जुगाड, थेट बाईकचा वापर करुन काम केलं सोपं; पाहा VIDEO

High Court News: विवाहित महिला लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप करु शकत नाही: हायकोर्ट

Surya Grahan 2024: २ ऑक्टोबरपासून 'या' राशींच्या आयुष्यावर लागणार ग्रहण; 'या' राशींवर घोंगावणार संकट

SCROLL FOR NEXT