बिझनेस

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

GST Impact: जीएसटी दर कमी झाल्यामुळे टाटाची परवडणारी फॅमिली कार टियागो आता ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली असून, २२ सप्टेंबर २०२५ नंतर तिची किंमत आणखी घटणार आहे.

Dhanshri Shintre

  • जीएसटी कपातीनंतर टाटा मोटर्सच्या कार आणि एसयूव्हींच्या किमती कमी

  • टाटा टियागो ७५,००० तर नेक्सॉन १.५५ लाख रुपयांनी स्वस्त

  • ग्राहकांसाठी सणासुदीपूर्वी मोठी आनंदवार्ता

  • पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांसाठी अधिक परवडणारा पर्याय

भारतीय कार बाजारपेठेत ग्राहकांसाठी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. जीएसटी कौन्सिलच्या अलीकडील कर सुधारणांनंतर टाटा मोटर्सने त्यांच्या कार आणि एसयूव्हींच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, कर कपातीचा संपूर्ण फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, कंपनी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा आणि अर्थमंत्र्यांच्या उद्दिष्टांचा आदर करते आणि जीएसटी सुधारणांचे संपूर्ण फायदे ग्राहकांना देणार आहे. त्यांच्या मते, या निर्णयामुळे भारतातील लाखो लोकांसाठी वैयक्तिक गतिशीलता आणखी सुलभ होईल.

ग्राहकांना काय फायदे आहेत?

टाटा टियागो: ७५,००० रुपयांपर्यंत स्वस्त

टिगोर: ८०,००० रुपयांनी स्वस्त

पंच: ८५,००० रुपयांपर्यंत स्वस्त

नेक्सॉन: १.५५ लाख रुपयांपर्यंत स्वस्त

हॅरियर आणि सफारी: १.४५ लाख रुपयांपर्यंत स्वस्त

नवीन जीएसटी दर

नव्या कर नियमांनुसार, पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजी कार (१२०० सीसीपर्यंत आणि ४ मीटरपर्यंत लांबी) तसेच डिझेल कार (१५०० सीसीपर्यंत आणि ४ मीटरपर्यंत लांबी) यांच्यावर आता केवळ १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे, जो पूर्वी २८ टक्के होता. दुसरीकडे, १२०० सीसीपेक्षा मोठ्या आणि ४ मीटरपेक्षा जास्त लांबीच्या वाहनांवर आता ४० टक्के कर लागू होईल.

नवरात्री आणि आगामी सणासुदीच्या काळात ही कपात ग्राहकांसाठी वरदान ठरणार आहे. बजेट-फ्रेंडली टाटा टियागोपासून लोकप्रिय एसयूव्ही नेक्सॉनपर्यंतच्या गाड्या आता अधिक परवडणाऱ्या झाल्याने कार खरेदीदारांचा खर्च कमी होणार आहे आणि पहिल्यांदाच वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी ही संधी अधिक खास ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

Maharashtra Politics: शिंदेसेनेचा नगराध्यक्ष भाजपनं पळवला, दिल्लीवारीनंतरही शिंदेंची कोंडी सुरुच

शिर्डीत झाडावर अवतरले साई? साईंच्या दर्शनासाठी उसळली गर्दी

स्मृती मंधाना-पलाशचं लग्न कुणामुळं पुढं ढकललं? संगीत सोहळ्याच्या रात्री काय घडलं? नवरदेवाच्या आईनं खरं कारण सांगितलं

Car Accident: भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT