Swiggy UPI Saam Tv
बिझनेस

Swiggy International login feature : स्विगीची कमाल, परदेशातही भारतीयांची धमाल; देशातल्या चटपटीत डिश मागवता येणार

mumbai : स्विगीने नुकतेच 'इंटरनॅशनल लॉगिन' फीचर सादर केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून परदेशात राहणाऱ्या व्यक्तीला भारतीय जेवणाची चव चाखता येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्विगीने नुकतेच 'इंटरनॅशनल लॉगिन' फीचर सादर केले आहे. या फीचरद्वारे, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि युएईसह 27 देशांतील वापरकर्ते त्यांच्या आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरून स्विगी ॲपच्या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकतात. या स्विगीने सादर केलेल्या या फिचरला टेक्नॉलॉजीचा बाप म्हणाल्या वावगे ठरणार नाही.  याचा फायदा अनिवासी भारतीयांना म्हणजेच एनआरआयला आणि पर्यायाने भारतात राहाणाऱ्यांना त्यांच्या प्रिय जणांना होणार आहे. 

कसे काम करेल हे फिचर?

अनिवासी भारतीय निर्धारित केलेल्या केलेल्या 27 देशांमधून याचा लाभ घेऊ शकतील. इंटरनॅशनल लॉगीन करून ते त्यांच्या प्रियजणांसाठी फुड डिलेव्हरीची सेवा देऊ शकतील.  या फीचरद्वारे, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि युएईसह 27 देशांतील वापरकर्ते त्यांच्या आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरून Swiggy ॲपच्या सर्व सेवांचा आता लाभ घेऊ शकतात. या विशेष वैशिष्ट्याद्वारे, ते आता स्विगीच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म स्विगी इंस्टामार्टवर सहजतेने फुड ऑर्डर करू शकतात आणि स्विगी डायनआउटद्वारे टेबल बुक करू शकतात.

पेमेंट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड किंवा UPI पर्याय वापरले जाऊ शकतात, ज्यामुळे Swiggy ची सेवा आता पूर्वीपेक्षा अधिक सोपी आणि अधिक सोयीस्कर झाली आहे. परदेशात वास्तव्यास असलेल्या अनेक भारतीय अशा फिचरची आतुरतेने वाट पाहत होते. आता ते त्यांच्या प्रियजनांना भेटवस्तू आणि सरप्राईज पाठवू शकतात.

अगदी वृद्ध पालकांना किराणा सामान किंवा आवश्यक वस्तू घरपोच देऊ शकतील. स्विगीचे सह-संस्थापक आणि सीजीओ फणी किशन म्हणाले, “सणांमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी फुड आणि भेटवस्तू महत्त्वाच्या असतात. आंतरराष्ट्रीय लॉगिनसह, परदेशात राहणारे लोक आता विशेष प्रसंगी त्यांच्या प्रियजनांना 'सरप्राईज' देऊ शकतील.

हे वैशिष्ट्य आमच्या आंतरराष्ट्रीय वापरकर्त्यांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे आणि सणांच्या वेळेतच लॉन्च केले जात आहे हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे किशन म्हणाले. लवकरच, अनिवासी भारतीय देखील परदेशात बसल्या बसल्या त्यांच्या प्रिय जणांना भारतात भेटवस्तू पाढवू शकतील. भारत हा सणांचा देश आहे. सण आणि उत्सवांनिमित्त प्रियजणांना मिठाई देण्याची पद्धत आहे. जे भारतीय नोकरी-व्यावसायानिमित्त इतर देशात स्थाईक झाले आहेत ते सण समारंभाला स्विगीच्या या नव्या फिचरला लाभ घेऊन कुटूंबीयांचा उत्साह द्विगुणीत करू शकतात. 

Edited By- नितीश गाडगे

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Ajit Pawar : नंदुरबारला पावरफुल पालकमंत्री मिळणार? अजित पवारांच्या नावाची जोरदार चर्चा

Custard Apple : सिताफळ खाण्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Hingoli Winter Tourism: गर्दीपासून लांब, निवांत ट्रिप! हिंगोलीजवळील या Hidden ठिकाणी घ्या गुलाबी थंडीची मज्जा

Mumbai : मुंबईतील धक्कादायक प्रकार! एकाच नंबरच्या दोन स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT