Sukanya Samruddhi Yojana Saam Tv
बिझनेस

Sukanya Samruddhi Yojana: लेकीच्या भविष्याची चिंता मिटली! मुलगी २१ वर्षांची झाल्यावर मिळतील ७० लाख रुपये; कसं ते जाणून घ्या

Sukanya Samruddhi Yojana For Girls: सरकारची सुकन्या समृद्धी योजना लोकप्रिय आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गुंतवणूकीवर सर्वाधिक व्याजदर मिळते.

Siddhi Hande

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलीच्या भविष्याची खूप काळजी असते. मुलीचे शिक्षण ते अगदी लग्नापर्यंत सर्व खर्च कसा होणार याबाबत चिंता असते. त्यामुळेच पालक मुलीच्या उज्जवल भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळेच मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी सुकन्या समृद्धी योजना राबवण्यात आली आहे.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सर्वाधिक व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यावर मुलींना भविष्यात कधीच कोणतीच अडचण येणार नाही.

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूकीवर भरघोस परतावा मिळतो. दहा वर्षांपर्यंतच्या मुलींच्या नावाने या योजनेत खाते उघडू शकतात. या योजनेत २५० रुपयांपासून ते दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिटदेखील मिळतो.

सुकन्या समृद्धी योजनेत जर मुलगी ५ वर्षांची असल्यावर गुंतवणूक केली तर मुलगी २१ वर्षांची झाल्यावर ५५.६१ लाख रुपये मिळतील. जर तुम्ही दर वर्षाला १.२ लाख रुपये गुंतवले तर ५५.६१ लाख रुपये मिळतील. यातील १७.९३ लाख रुपये गुंतवणूक असेल तर ३८.६८ रुपये व्याजदर असेल. या योजनेत जर तुम्ही १.५ लाखांची गुंतवणूक केली तर मुलगी २१ वर्षांची झाल्यावर ६९.८ लाख रुपये मिळतील. (Sukanya Samruddhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा १५ वर्षांचा असतो. या योजनेत तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक कराल तेवढा चांगला परतावा तुम्हाला मिळेल. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्हाला कर सवलतदेखील मिळते. सुकन्या समृद्धी योजना ही सर्वाधिक व्याजदर देणारी योजना आहे. त्यात तुम्हाला ८.२ टक्के व्याज मिळते. (Sukanya Samruddhi Scheme for Women)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT