सध्याची वाढती महागाई पाहता सर्वसामान्यांना भविष्यासाठी मोठी बचत करावी लागू शकते. कुटुंबासाठी आणि विशेषता मुलींच्या शिक्षणासाठी तुम्हाला बचक करायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना ही सर्वात जास्त फायदेशीर ठरू शकते. तुम्ही या योजनेत महिन्याला २००० रुपये गुंतवून मुलीच्या नावावर एकूण ११ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकता. त्याने मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्यावर आर्थिक भार येणार नाही.
सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या तिमाहीसाठी ८.२ टक्के वार्षिक व्याजदर लागू आहे. समजा, मुलीच्या जन्मानंतर लगेच खातं उघडलं आणि दरमहिन्याला २००० रुपये जमा केले तर गुंतवणुकीचं गणित पुढीलप्रमाणे असेल.
दर महिन्याची गुंतवणूक - २००० रुपये
वार्षिक गुंतवणूक - २४,००० रुपये
१५ वर्षांतली एकूण गुंतवणूक - ३ लाख ६० हजार रुपये
व्याजदर - ८.२ टक्के
खाते मॅच्युरिटीचा कालावधी - २१ वर्षे
मॅच्युरिटीवेळी मिळणारी रक्कम - अंदाजे ११.०९ लाख रुपये
एकूण व्याजातून मिळणारा फायदा - अंदाजे ७.४९ लाख रुपये
म्हणजेच, पालकांनी स्वत:च्या खिशातून फक्त ३.६० लाख रुपये भरले, तर व्याजासोबत मुलीच्या नावावर अंदाजे ११.०९ लाख रुपयांचा निधी तयार होऊ शकतो.
या योजनेचे वैशिष्ट म्हणजे खातं उघडल्यानंतर पहिली १५ वर्षच पैसे जमा करावे लागतात. त्यानंतर पुढच्या सहा वर्ष कोणतीही रक्कम जमा करण्याची गरज नसते. मात्र, खात्यातील जमा रकमेवर २१ वर्षे पूर्ण होईपर्यंत व्याज मिळत राहतं. त्यामुळे दीर्घकाळात चांगला निधी तयार व्हायला मदत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.