Success Story Of Quick Heal Founder Kailash Katkar:  Saamtv
बिझनेस

Who Is Kailash Katkar: गरिबीमुळे शाळा सोडली, कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं काम केलं, या मराठी माणसाने उभारले ५४.८ कोटींचे साम्राज्य; वाचा..

Success Story Of Quick Heal Founder Kailash Katkar: घरच्या गरिबीने 10वीचे शिक्षण अर्धवट सोडलेल्या कैलाशच्या कंपनी क्विक हील टेक्नॉलॉजीजचे मूल्य आज 14 हजार कोटी रुपये आहे. एकेकाळी कॅल्क्युलेटर आणि रेडिओ दुरुस्त करणारी ही व्यक्ती आज जगभरातील करोडो कॉम्प्युटर, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचे व्हायरसपासून संरक्षण करते

Gangappa Pujari

Story of Quick Heal: ज्याच्यात काहीतरी करण्याची जिद्द, कष्ट करण्याची ताकद आणि भविष्यातील शक्यता ओळखण्याची दृष्टी असेल, त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अँटीव्हायरस आणि इतर कॉम्प्युटर सोल्यूशन्स पुरवणाऱ्या क्विक हील या कंपनीचे संस्थापक कैलाश काटकर यांनी हे सिद्ध केले आहे. घरच्या गरिबीने 10वीचे शिक्षण अर्धवट सोडलेल्या कैलाशच्या कंपनी क्विक हील टेक्नॉलॉजीजचे मूल्य आज 14 हजार कोटी रुपये आहे. एकेकाळी कॅल्क्युलेटर आणि रेडिओ दुरुस्त करणारी ही व्यक्ती आज जगभरातील करोडो कॉम्प्युटर, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचे व्हायरसपासून संरक्षण करते. काय आहे या क्विक हिलच्या यशाची स्टोरी? वाचा...

१० वीतून सोडली शाळा..

महाराष्ट्रातील रहिमतपूर गावात जन्मलेल्या कैलास काटकर यांना कौटुंबिक कारणांमुळे दहावीचे शिक्षण सोडावे लागले. शाळा सुटल्यानंतर ते पुण्यात आले. येथे त्यांनी रेडिओ आणि कॅल्क्युलेटर दुरुस्तीच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. कैलास यांना महिन्याला 400 रुपये पगार मिळत असे. ते लवकरच रेडिओ दुरुस्तीमध्ये पारंगत झाला. 1991 मध्ये त्यांनी 15,000 रुपये गुंतवून दुकान उघडले. घरखर्च चालवण्यासोबतच कैलास त्यांचा भाऊ संजय काटकरच्या शिक्षणाचा खर्चही कसेतरी भागवत होते. त्यांचा धाकटा भाऊ त्यावेळी कॉम्प्युटर सायन्स शिकत होता.

संगणक पाहून सुचली आयडिया..

दुकान उघडल्यानंतर एके दिवशी कैलास काटकर बँकेत गेले आणि तेथे त्यांनी प्रथमच संगणक पाहिला. तो संगणकाने खूप प्रभावित झाले होते. कामासोबतच त्यांनी शॉर्ट टर्म कॉम्प्युटर कोर्सला प्रवेश घेतला. काही वेळाने त्यांनी संगणक घेतला आणि त्यावर काम सुरू केले. सॉफ्टवेअरसोबतच त्यांना हार्डवेअरचेही बऱ्यापैकी ज्ञान मिळाले. काही काळानंतर, कैलास काटकर यांनी संगणक दुरुस्तीचे काम देखील सुरू केले आणि 1993 मध्ये त्यांनी CAT संगणक दुरुस्ती आणि सेवा नावाने स्वतःची कंपनी सुरू केली. संगणक दुरुस्त करत असताना त्यांच्या लक्षात आले की, दुरुस्तीसाठी येणारे बहुतांश संगणक व्हायरसमुळे खराब होतात. यामुळे त्यांच्या डोक्यात एक विचार आला की जर अँटी व्हायरस बनवला आणि विकला तर भरपूर पैसे कमावता येतात.

क्विक हीलची स्थापना!

त्यानंतर त्यांनी त्यांची योजना कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतलेला त्याचा भाऊ संजय काटकर याला सांगितली. दोन्ही भावांनी मिळून त्यांच्या कॉम्प्युटर रिपेअरिंगच्या दुकानात अँटी व्हायरस तयार केला. दुरूस्तीसाठी आलेल्या संगणकांवर प्रयत्न केला. त्याचे परिणाम चांगले आले. 1995 मध्ये त्यांनी त्यांचे पहिले उत्पादन बाजारात आणले. हा अँटी व्हायरस त्याने 700 रुपयांना विकला.

पहिल्या अँटी व्हायरसला बाजारातून भरपूर प्रतिसाद मिळाल्यानंतर दोन्ही भावांनी त्यांचे संपूर्ण लक्ष फक्त अँटी व्हायरसवर केंद्रित केले. 2007 मध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीचे नाव CAT Computer Services Limited वरून बदलून Quick Heal Technologies असे केले. काटकर ब्रदर्सने 2011-12 मध्ये एंटरप्राइज सोल्युशन्स व्यवसायात प्रवेश केला. मग हळूहळू कंपनी एक जागतिक ब्रँड म्हणून नावारुपाला आली.आज क्विक हील अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. त्याची कार्यालये जपान, अमेरिका, आफ्रिका आणि UAE मध्ये आहेत. कंपनी 2016 मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT