Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: दिवसभर मोबाईल कव्हर विकायचा, अन् रात्रभर अभ्यास; भाजी मंडईत काम करणाऱ्या मुलाने क्रॅक केली NEET

Success Story of Mobile Cover Seller Crack NEET: परिस्थितीमुळे माणसाने संपूर्ण आयुष्य बदलतं. तसेच परिस्थिती बदलण्याची ताकदही तुमच्यात असते. असंच काहीसं झारखंडच्या रोहित कुमारने केलं आहे. त्याने नीट परीक्षा क्रॅक केली आहे.

Siddhi Hande

आयुष्यात परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते. परिस्थितीमुळे माणूस बदलतो काहीतरी नवीन करायचं ठरवतो. ही परिस्थिती बदलण्याची ताकददेखील तुमच्यातच असते. असंच काहीसं झारखंडच्या एका मुलाने केलं आहे. मोबाईलचे कव्हर विकणाऱ्या मुलाने नीट (NEET) परीक्षा क्रॅक केली आहे.(Success Story)

झारखंडमधील जमशेदपूरच्या (Jamshedpur) एका मुलाने नीट परीक्षेत चांगले गुण मिळवले आहे. त्याचे डॉक्टर व्हायचे स्वप्न आहे आणि तो ते लवकरच पूर्ण करणार आहे.रोहित कुमार असं या मुलाचं नाव आहे. रोहित कुमारने नीटच्या परीक्षेत ५४९ गुण प्राप्त केले आहेत. त्याने नीट परीक्षेत ऑल इंडिया रँक १२,४८४ प्राप्त केली आहे. यानंतर त्याला आता सरकारी मेडिकल हॉस्पिटलमध्ये अॅडमिशन घ्यायचे आहेत.

याबाबत फिजिक्सवाला, यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या क्लासच्या उम्मीद बॅचच्या मुलांना मोफत कोचिंग दिले जाते. याच कोचिंग क्लासमधून रोहितने नीटचे प्रशिक्षण घेतले आणि आज त्याने नीट (NEET) क्रॅक केली आहे.

रोहित कुमारचे वडील भाजी मंडईत काम करायचे. बारावीनंतर त्याने एका वर्षाचा कालावधी घेतला आणि नीटची तयारी केली. कोरोना काळात त्याने मेडिकलमध्ये काम केले. तिथेच त्याला गोळ्या-औषधांबद्दल उत्सुकता निर्माण झाली.

रोहित हा दिवसभर फोन कव्हर विकायचा आणि रात्री ३ वाजेपर्यंत अभ्यास करायचा. दिवसा काम आणि रात्री अभ्यास असा त्याचा दिनक्रम होता. त्याच्या या मेहनतीमुळेच त्याला हे यश मिळालं आहे. त्यानंतर तो लवकरच मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन घेईल आणि डॉक्टर बनेल, असं त्याच्या कुटुंबाचे स्वप्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT