Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: पोलिस कॉन्स्टेबल असताना अपमान झाला, नोकरी सोडली, स्वाभिमानासाठी केली UPSC क्रॅक; उदय कृष्ण रेड्डी यांचा प्रवास

Success Story of IPS Uday Krishna Reddy: उदय कृष्ण रेड्डी यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली आहे. पोलिस कॉन्स्टेबल असताना त्यांचा अपमान झाला होता. त्यानंतर त्यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतात. परंतु अनेकदा माणसाला मेहनत करण्यासाठी काहीतरी प्रेरणा लागते. काहींना इतरांकडे बघून प्रेरणा मिळते. तर काहीजणांना स्वतः मध्ये बदल करण्याची गरज वाटते. त्यासाठी ते प्रेरित होतात. असंच काहीसं उदय कृष्ण रेड्डी यांनी केलं. त्यांचा कॉन्स्टेबल ते पोलिस ऑफिस होण्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.

अपमान झाला, स्वाभिमानासाठी थेट UPSC क्रॅक

उदय कृष्ण रेड्डी हे कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. तेव्हा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा अपमान झाला. त्यांचा अपमान झाल्याचे त्यांना सहन झाले नाही. त्याच दिवशी त्यांनी निश्चय केला की मीदेखील पोलिस अधिकारी होणार. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षा पासदेखील केली.

स्पर्धा परीक्षेसाठी समर्पण

उदय कृष्णा रेड्डी हे आंध्र प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. तेव्हा त्यांच्या एका सिनियरने त्यांचा अपमान केला होता. तेच लक्षात ठेवून त्यांनी चांगली सरकारी नोकरी सोडली आणि यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

उदय कृष्ण रेड्डी यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली. यासाठी दिवसरात्र मेहनत केली. त्यांनी २०२३ मध्ये ऑल इंडिया रँक ७८० प्राप्त केली.उदय कृष्ण रेड्डी हे रोज ८-१० तास अभ्यास करायचे. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याचे फळ त्यांना मिळाले. ते चांगल्या पदावर कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Sumangala Yojana: लाडक्या लेकींना जन्मापासून मिळणार २५,००० रुपये, काय आहे सरकारची खास योजना?

Maharashtra News Live Update: खोपोलीच्या डम्पिंग ग्राऊंडला महिन्याभरात तिसऱ्यांदा आग

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, ५ ते ६ जणांनी भररस्त्यात कोयत्याने केले सपासप वार

Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

SCROLL FOR NEXT