Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, नंतर UPSC केली क्रॅक; निर्भीड IPS ऑफिसर विकास वैभव यांचा प्रवास

Success Story of IPS Vikas Vaibhav: आयपीएस विकास वैभव हे एक निर्भीड अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

आयपीएस विकास वैभव यांचा प्रेरणादायी प्रवास

२००३ मध्ये पास केली UPSC

IIT मधून घेतलं इंजिनियरिंगचं शिक्षण

यूपीएससी परीक्षा देऊन अनेकांना प्रशासकीय सेवेत काम करायचे असते. समाजात काहीतरी नवीन चांगला बदल घडवून आणायचा असतो. यासाठी आयएएस, आयपीएस व्हायचे असते. आयएएस, आयपीएस होण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करावा लागतो. दरम्यान, तुम्ही जर मनापासून मेहनत केली तर त्याचे फळ हे तुम्हाला मिळते. असंच काहीसं विकास वैभव यांच्यासोबत झाले. ते निर्भीड आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

विकास वैभव हे मूळचे बेगूसराय येथील बीहटचे रहिवासी. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९७९ रोजी झाला. विकास यांनी आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये बीटेक केले. या काळात ते खूप काही शिकले. आयआयटीमधील काळ हा त्यांच्यासाठी लर्निंग फेज होता, असं ते सांगतात. आयपीएस विकास वैभव यांनी २००३ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली आणि आयपीएस अधिकारी झाले.

आयपीएस वैभव यांनी २० वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ प्रशासकीय सेवेत काम करत आहेत. ते आजपर्यंत कोणालाच घाबरले नाही. त्यांनी नेहमी सामाजिक कार्यात आपले योगदान दिले.

विकास वैभव हे सामाजिक कार्य करत आहे. ते गरीब आणि वंचित कुटुंबातील मुलांना आयआयटी आणि नीट परीक्षेसाठी कोणतीही फी न घेता तयारी करुन घेत आहे. लेट्स इन्स्पायर बिहार ही त्यांची संस्था आहे. या माध्यमातून ते तरुणांना मदत करत आहेत.

विकास वैभव यांनी २००३ मध्ये यूपीएससी (UPSC) परीक्षा पास केली. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी दिवसरात्र अभ्यास केला. त्याचेच फळ त्यांना मिळाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चांगली कामे केले. ते कधीच कोणाला घाबरले नाही. समाजासाठी जे योग्य आहे तेच त्यांनी केलं. ते नेहमी चर्चेत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Bite : नुकसानीचे पंचनामे करताना तलाठ्याला सर्पदंश; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Pakistan: पाकिस्तानला पुन्हा हादरा! पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू

Hair Wash Routine: आठवड्यातून किती वेळा धुवावेत केस? जाणून घ्या पद्धत

Hidden Mumbai Places: गर्दीपासून दूर कपल्ससाठी परफेक्ट Top 7 स्पॉट्स; विकेंडला जोडीदार होईल खुश

Maharashtra Live News Update: मराठी रंगभूमीवरील मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

SCROLL FOR NEXT