Success Story Of IIT Couple Pani Puri Buisness Saam Tv
बिझनेस

Success Story : नोकरी सोडली, IIT कपलने लंडनमध्ये थाटला पाणीपुरीचा व्यवसाय; एका प्लेटची किंमत जाणून व्हाल थक्क

Success Story Of IIT Couple Pani Puri Buisness : IITमधून शिक्षण घेतलेल्या जोडप्याने कॉरपोरेट नोकरी सोडून लंडनमध्ये ‘Bouzi Club’ सुरू केला आहे. या क्लबमध्ये एका वेळेच्या जेवणाची किंमत ५० पाऊंड म्हणजेच सुमारे ६,००० रुपये प्रति व्यक्ती आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरी समाविष्ट असून लंडनमधील नागरिकांची त्याला जास्त पसंती आहे.

Alisha Khedekar

  • IIT शिक्षित जोडप्याने कॉरपोरेट नोकरीला केला रामराम

  • लंडनमध्ये ‘The Bouzi Club’ नावाचा सुप्पर क्लब सुरू

  • पाणीपुरी ठरली टर्निंग पॉइंट

  • भारतीय चवीमुळे परदेशात मोठी लोकप्रियता

खूप शिकायचं मोठं व्हायचं! नोकरी करायची आणि गलेलठ्ठ पगारात ऐशोआरामाच जीवन जगायचं. या वाक्याला छेद देत एका IITN जोडप्याने कॉरपोरेट कंपनीतील चांगल्या पगारातील नोकरी सोडून थेट लंडन गाठलं. आश्चर्यकारक म्हणजे हे कपलं सध्या तिथे राहून पाणी पुरी विकत आहे. त्यांची जेवणाची एक प्लेट तब्बल ६००० रुपयांना विकली जाते. अंकिता खांटे आणि अमन कृष्णा अशी या दोघांची नावं आहेत.

अंकिता खांटे या नागपूरमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी व्हीएनआयटी नागपूरमधून आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेतले. नंतर आयआयटी गुवाहाटीमधून डिझाइनमध्ये पदवी घेतली. २०२४ मध्ये लग्नानंतर त्या युकेमध्ये स्थायिक झाल्या. त्यांचे पती अमन हे मूळचे उत्तर प्रदेशातील ओब्रा येथील असून त्यांनी आयआयटी धनबाद आणि आयआयआयटी हैदराबादमधून कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलं.

दोघांनाही कोणत्याही हॉटेल व्यवसायाचा अनुभव नसतानाही, या जोडप्यानं भारतीय आदरातिथ्याच्या संस्कृतीच्या जोरावर काहीतरी खास करण्याचं ठरवलं. लंडनला गेल्यानंतर अंकिता यांनी काही काळ नोकरीतून रजा घेतली. त्यापूर्वी त्यांनी बंगळुरूमधील सॅमसंग रिसर्चमध्ये प्रॉडक्ट डिझायनर म्हणून तीन वर्ष काम केलं. जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना घरी बोलावून जेवू घालण्याची त्यांची आवड एका मोठ्या व्यवसायात बदलली. यातूनच 'The Bouzi Club' चा जन्म झाला. हा एक मासिक, तिकीट असलेला सपर क्लब (खानावळीप्रमाणे) असून तो हे दोघे आपल्या घरीच आयोजित करतात.

या क्लबमध्ये दरवेळी १० ते १२ पाहुण्यांना आमंत्रित केलं जातं. त्यांना सात कोर्सचा एक खास मेन्यू दिला जातो. या मेन्यूमध्ये भारतातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील काही पदार्थांचा समावेश असतो. यामध्ये 'ढोली कढी' आणि 'नागपूर स्टाईल सांभर वडी' या पदार्थांना मोठी पसंती मिळते. या क्लबमध्ये एका वेळेच्या जेवणाची किंमत ५० पाऊंड म्हणजेच सुमारे ६,००० रुपये प्रति व्यक्ती आहे. अंकिता यांनी सांगितलं की, सुरुवातीला या व्यवसायाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, जसं त्यांनी पाणीपुरी देण्यास सुरुवात केली, तसं सर्व काही बदललं असल्याचं अंकिता यांनी मुलाखतीत सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Price Today: चांदीच्या दरात पुन्हा घसरण, २०००० रुपयांनी झाली स्वस्त; १० ग्रॅमसाठी किती मोजावे लागणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लोकसभेत हल्ला होणार होता; बड्या नेत्याचा स्फोटक दावा

Maharashtra Live News Update: सत्ताधारी कामे मंजूर करून खोटी बिलं काढतात, शेकाप नेते जयंत पाटील यांचा आरोप

Prajakta Gaikwad: प्राजक्ता साकारणार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची भूमिका; 'भिडेवाडा' चित्रपटाची भव्य घोषणा

Bridal Skincare Tips: चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? लग्नाच्या शेवटच्या महिन्यात या 5 गोष्टी करा

SCROLL FOR NEXT