Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: कोणत्याही कोचिंगशिवाय २२व्या वर्षी UPSC क्रॅक; IFS मुस्कान जिंदल यांचा प्रवास

Success Story of IFS Muskan Jindal: आयएफएस मुस्कान जिंदल यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्लिअर केली.

Siddhi Hande

IFS मुस्कान जिंदल यांचा प्रेरणादायी प्रवास

२२व्या वर्षी क्रॅक केली UPSC

पहिल्या प्रयत्नात झाल्या आयएफएस अधिकारी

प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु त्यासाठी दिवसरात्र एक करुन मेहनत करावी लागते. जर तुम्ही काही दिवस खूप मेहनत, अभ्यास केला तर तुमचं आयुष्यचं बदलून जाईल. यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करायला हवे. असंच काहीसं मुस्कान जिंदल यांनी केलं. त्यांनी दिवसरात्र अभ्यास केला. याचाच परिणाम असा की, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

मुस्कान या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. प्रशासकीय सेवेत काम करण्याचे त्यांचे आधीपासून स्वप्न होतं. त्या शाळेत आणि कॉलेजमध्ये नेहमी टॉपर होत्या. त्यांना बारावीत ९६ टक्के गुण मिळाले होते. त्यांनी नेहमीच अभ्यासाला प्राधान्य दिलं.

बारावीनंतर त्यांनी चंदीगडमधील पंजाब युनिव्हर्सिटीमधून बी.कॉम केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी रोज ७ ते ८ तास अभ्यास केला. त्यांनी आपला निश्चय आणि मेहनतीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी २०१९ मध्ये ८७ रँक प्राप्त केली. त्यांनी खूप कमी वयात यूपीएससी परीक्षा पास केली. २२ व्या वर्षी त्या आयएफएस अधिकारी बनल्या.

मुस्कान यांनी यूपीएससी परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्गदर्शन घेतले. परंतु त्यांनी सेल्फ स्टडीवर जास्त फोकस केला. त्यांनी आपले टार्गेट सेट केले आणि त्यानुसार अभ्यास केला. त्यांनी दिवसाला जवळपास ७ ते ८ तास अभ्यास केला.

यूपीएससी परीक्षेची तयारी करताना त्यांनी ऑनलाइन अभ्यास केला. त्यांच्या मते, फोन जरी जवळ असेल तरीही तुमचे तुमच्या मनावर नियंत्रण असणे खूप गरजेचे आहे. तरंच तुम्हाला यश मिळेल. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि त्या आज IFS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT