Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: दुसर्‍याच प्रयत्नात UPSC क्रॅक, २३ व्या वर्षी IAS, स्मिता सभरवाल यांची सक्सेस स्टोरी

Success Story Of IAS Smita Sabharwal: स्मिता सभरवाल यांनी वयाच्या २३ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांना दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळाले. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देताना अनेकदा अपयश येते. परंतु या अपयशामुळे न खचता जो व्यक्ती पुढे प्रयत्न तो व्यक्ती नक्कीच यशस्वी होतो. असंच काहीस आयएएस स्मिता सभरवाल यांच्यासोबत झालं. (Success Story OF IAS Smita Sabharwal)

स्मिता सभरवाल यांनी वयाच्या २३ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. स्मिता या नेहमीच त्यांच्या इमानदारीमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात.स्मिता यांचा जन्म १९७७ मध्ये पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झाला. त्यांचे वडील सेवानिवृत्त आर्मी अधिकारी आहेत. त्यांचे नाव प्रणव दास आहे. वडील आर्मीत काम करत असल्याने त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या शहरांध्ये झाले. सेवानिवृत्तीनंतर ते हैदराबादला शिफ्ट झाले. स्मिता सभरवाल या खूप हुशार होत्या. त्या बारावीत टॉपर होत्या. त्यांनी कॉमर्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

स्मिता सभरवाल यांनी पहिल्या प्रयत्नात प्रिलियमदेखील क्लिअर नाही केली. परंतु त्यांनी हार मानली नाही. पुढच्या वेळी त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.२००० साली खूप कमी वयात यूपीएससी क्रॅक करुन स्मिता सभरवाल या आयएएस अधिकारी झाल्या. त्यांनी ४ रँक मिळवली. (UPSC Success Story)

स्मिता सभरवाल यांनी खूप कमी वयात चांगली कामगिरी केली. मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत होणाऱ्या पहिल्या महिला IAS अधिकारी आहेत. खूप कमी वयात स्मिता सभरवाल यांनी यश मिळवलं. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT