IAS नमामि बन्सल यांचा प्रेरणादायी प्रवास
दिवसा नोकरी अन् रात्री यूपीएससीचा अभ्यास
संपूर्ण देशात मिळवली १७वी रँक
यूपीएससी परीक्षा देणे हे सर्वांसाठी अवघड आहे. देशातील सर्वात अवघड परीक्षा पास करण्यासाठी जिद्द, इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची ताकद लागते. जर तुम्ही खूप मेहनत घेतली तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळते. असंच यश आयएएस नमामि बन्सल यांना मिळालं. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास करुन आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
ऋषिकेशची लहानशी गल्ली ते IAS अधिकारी
नमामि बन्सल या मूळच्या उत्तराखंडच्या ऋषिकेशच्या रहिवासी. ऋषिकेशच्या लहानश्या गल्लीतून सुरु झालेला हा प्रवास यूपीएससीपर्यंत पोहचला. या प्रवासात अनेक अडचणी आल्या परंतु या अडचणींवर त्यांनी मात केली.
नमामि यांचे बालपण ऋषिकेशमध्ये गेले. त्यांच्या वडिलांचे राजकुमार बन्सल यांचे भांड्यांचे लहानसे दुकान आहे. या दुकानातून येणाऱ्या उत्पन्नातून घराचा खर्च भागत नव्हता. बालपणी आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांच्याकडे फार पैसे नव्हते. परंतु नमामि यांच्याकडे शिकण्याची इच्छा होती.त्या लहानपणापासूनच हुशार होत्या.
नमामि बन्सल यांचे शिक्षण (IAS Namami Bansal Education)
नमामि यांनी दहावीत ९२ टक्के तर बारावीत ९५ टक्के गुण मिळवले होते. त्यांनी दिल्लीती लेडी श्रीराम कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यांनी अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर एम.ए शिक्षण पूर्ण केले. त्यांनी मुक्त विद्यापीठातून पहिला क्रमांक मिळवला.
कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी नमामि यांनी नोकरी सुरु केली. परंतु याच काळात त्यांना देशासाठी काहीतरी करावसं वाटलं. त्यांना आयएएस व्हावसं वाटलं. त्यांनी नोकरी सांभाळत यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षा पास केली.
दिवसा नोकरी केल्यानंतर त्या रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायच्या. त्यांनी २०१७ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी चौथ्या प्रयत्नात परीक्षा पास केली. त्यांनी संपूर्ण देशात १७वी रँक प्राप्त केली. त्यांनी खूप जिद्दीने आणि मेहनतीने हे यश मिळवले. त्या अनेकांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.