यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षा देतात.त्यातील काही जण खूप कमी वयात यशस्वी होतात. परंतु पंजाबच्या चंद्रज्योती सिंह या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्या आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
आयएएस चंद्रज्योती यांचे आईवडिल दोघेही देशसेवेत होते. त्यांचे वडिल कर्नल दलबरा सिंह रिटायर्ड आर्मी रेडियोलॉजिस्ट आहेत. तर आई लेफ्टनंट कर्नल मीना सिंह यादेखील सैन्यात होत्या. त्यांच्या आईवडिलांच्या पायावर पाय ठेवत चंद्रज्योती यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी यश मिळवले. (Success story Of IAS Chandrajyoti)
आयएएस चंद्रज्योती (IAS Chandrajyoti) यांच्या आईवडिलांनी नेहमीच त्यांच्या शिक्षणाला पाठिंबा दिली. ते नेहमी त्यांच्यासोबत उभे होते. आईवडिल आर्मीत असल्याने त्यांना शिक्षणासाठी अनेक शहरांमध्ये जावे लागले. त्यांनी दहावीची परीक्षा जालंधरमधून दिली. तर १२ वी चंदीगडच्या कॉलेजमधून दिली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतून पदवीचे शिक्षण घेतले.
दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी १ वर्षाचा ब्रेक घेतला. २०१८ साली त्यांनी यूपीएससी परिक्षेची तयारी केली. त्यांनी सेल्फ स्टडी करत परीक्षा क्रॅक केली. चंद्रज्योती या २२ व्या वर्षी आयएएस ऑफिसर झाल्या. त्या रोज १-२ वर्तमानपत्र वाचायच्या. त्यांनी मॉक टेस्ट दिल्या. त्या पंजाब कॅडरमध्ये आयएएस अधिकारी झाल्या.
आयएएस चंद्रज्योती यांनी सेल्फ स्टडी करत परीक्षा दिली. त्यांनी कोणताही कोचिंग क्लास जॉइन केला नव्हता. त्यांनी देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी प्रयत्न केले. आर्मीतील अधिकाऱ्यांची लेक आता आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. (UPSC Success Story)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.