Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: रतन टाटांची ७००० कोटींची ऑफर नाकारली, पाणी विकून कमावले २३०० कोटी रुपये; जयंती चौहान यांनी सक्सेस स्टोरी वाचा

Success Story Of Jayanti Chauhan: बिसलरी ही बाटलीबंद पाणी विकण्याच्या व्यवसायात खूप मोठी कंपनी आहे. ही कंपनी विकण्याची वेळ रमेश चौहान यांच्यावर आली होती. परंतु त्यांनी त्यातूनही मार्ग काढला.

Siddhi Hande

आयुष्यात कितीही अपयश आले तरीही आयुष्यात हार मानायची नाही. आपले प्रयत्न नेहमी करायचो. आयुष्यात नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. असंच काहीसं जयंती चौहान यांच्यासोबत झालं आहे. एकेकाळी आपल्या वडिलांनी उभारलेली कंपनी विकण्याचीदेखील वेळ त्यांच्यावर आली होती. परंतु यातूनही मार्ग काढत त्यांनी पुन्हा कंपनी उभारली आहे.(Success Story of bisleri owner)

देशात बाटलीबंद पाणी विकण्याच्या व्यवसायात 'बिसलरी' (Bisleri) ही नंबर एकची कंपनी आहे. रमेश चौहान हे या कंपनीचे मालक आहे. २०२२व्या वर्षी त्यांच्यावर कंपनी विकण्याची परिस्थिती आली होती. त्यांनी आपला व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला होता. वयामुळे व्यवसाय सांभाळायला जमत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. (Jayanti Chauhan Success Story)

रमेश चौहान यांची लेक जयंती यांना या व्यवसायात फार रस नव्हता. त्यामुळेच ते ही कंपनी विकत होते.भारतात मिनरल वॉटर मार्केटमध्ये ३२ टक्के मार्केट हे बिसलरी कंपनीचे आहे. या कंपनीला खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्या इच्छुक होत्या. टाटा कंपनीदेखील बिसलरी कंपनी विकत घेण्यासाठी इच्छुक होती. रतन टाटा यांनी ७००० कोटींची ऑफर दिली होती. परंतु या ऑफरला जयंती यांनी नाकारले.

जयंती यांना या व्यवसायात फार रस नव्हता.परंतु वडिलांमुळे त्या या व्यवसायात आल्या. जयंती चव्हाण यांनी बिझनेस सांभाळायला घेतल्यामुळे टाटा यांच्यासोबतची डील होऊ शकली नाही. जयंती यांनी अनेक नवीन प्रयोग केले. त्यांनी ऑरेंज, जिरा, कोला या कॅटेगरीमध्ये कोल्डड्रिंक्सदेखील सुरु केले. त्याचसोबत त्यांनी डिजिटल आणि सोशल मिडिया मार्केटिंगदेखील केले. जयंती चौहान यांनी वयाच्या २४ व्या वर्षी व्यवसाय सांभाळण्यास सुरु केली.या कंपनीची मार्केट कॅप २३०० कोटी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watermelon Storage Tips: कापलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवायचा की नाही? जाणून घ्या

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT