Jaipur Friends Clothes Brand Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story : १७ हजारात व्यवसाय उभारला, सहा महिन्यात १५ लाखांचा नफा; जयपूरमधील दोन बेस्टफ्रेंडची सोशल मीडियावर चर्चा

Jaipur Friends Clothes Brand Success Story : जयपूरमधील दोन कॉलेज मैत्रिणींनी इंटर्नशिपमधून साठवलेल्या १७ हजार रुपयांत कपड्यांचा ब्रँड सुरू केला. अवघ्या ६ महिन्यांत १,२०० हून अधिक ऑर्डर पूर्ण करत लाखोंचा नफा कमावला. त्यांच्या जिद्दीची सर्वत्र चर्चा होत आहे.

Alisha Khedekar

  • १७ हजार रुपयांत एप्रिल २०२५ मध्ये कपड्यांचा ब्रँड सुरू

  • ६ महिन्यांत १,२०० पेक्षा अधिक ऑर्डर पूर्ण

  • १२ ते १५ लाखांपर्यंत नफा मिळवण्यात यश

  • पालकांचा विरोध झुगारून जिद्दीने उभारला व्यवसाय

जयपूरमध्ये कॉलेज मैत्रिणीने एका छोट्या रकमेतून व्यवसायाचं रोपटं लावलं. या रोपट्याचे आता झाडामध्ये रूपांतर झालं आहे. पदवी परीक्षा पार पडल्यानंतर या दोघीनींही व्यवसायाचा मार्ग स्वीकारून अवघ्या काही दिवसांत स्वतःचा कपड्यांचा ब्रँड निर्माण केला आणि प्रसिद्धी मिळवली. इंटर्नशिप आणि इतर ठिकाणी काम करून मेहनतीच्या १७ हजार रुपयांनी त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आणि ६ महिन्यात त्याची उलाढाल १५ लाखांपर्यंत पोहचली.

विदुशी आणि नेहा या दोघी जवळच्या मैत्रिणी आहेत. दोघीनींही शहरातील कनोरिया पीजी महिला महाविद्यालयातून बीबीए ची पदवी प्राप्त केली आहे. पदवी नंतर लगेच त्यांनी व्यवसायाकडे वळण्याचे ठरवले.

व्यवसायाकडे वळण्यापूर्वी या दोघींनी सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये मदत करण्यासाठी स्थानिक कॅफे, रेस्टॉरंट्स आणि फूड बिझनेसमध्ये छोटी-मोठी कामे करायला सुरुवात केली.कॉलेज संपल्यानंतर लगेच इंटर्नशिपमधून साठवलेल्या १७ हजार रुपयांनी त्यांनी एप्रिल २०२५ मध्ये स्वतःचा कपड्यांचा ब्रँड तयार केला.

या दोघींच्या पालकांकडून त्यांच्या व्यवसायाला विरोध होता. मात्र पालकांना न जुमानता या दोन मैत्रिणींच्या जिद्दीने सहा महिन्यात १,२०० हून अधिक ऑर्डर मिळवल्या. यातून त्यांना १२ ते १५ लाखांचा फायदा झाला. मुलींच्या चिकाटीने आणि मेहनतीने यशाचे टोक गाठले. या दोघींच्या यशाचे आणि त्यांच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीचा मोठा खुलासा; 2027 चा वर्ल्डकप भारतासाठी शेवटचा, रोहितनेही सांगितला प्लान

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

SCROLL FOR NEXT