Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: जिद्द! घर, कुटुंब सांभाळत लग्नानंतर क्रॅक केली UPSC; IAS बी चंद्रकला यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of Of IAS B Chandrakala: आयएएस बी चंद्रकला यांनी लग्नानंतर यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी खूप मेहनतीने घर कुटुंब सांभाळत स्पर्धा परीक्षा दिली आणि ती पासदेखील केली.

Siddhi Hande

IAS बी चंद्रकला यांचा प्रेरणादायी प्रवास

लग्नानंतर क्रॅक केली UPSC परीक्षा

घर, कुटुंब सांभाळत मिळवले यश

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. परंतु एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्या मेहनतीचे यश मिळते. या प्रवासात अनेक अडचणी येतात. परंतु कितीही अडचणी आल्या तरीही तुम्ही त्यावर मात करा. असंच काहीसं आयएएस बी चंद्रकला यांनी केलं. आयएएस बी चंद्रकला या नेहमी चर्चेत असतात. त्यांना लेडी सिंघम या नावानेदेखील ओळखले जाते.

आयएएस बी चंद्रकला या मूळच्या तेलंगणाच्या करीमनगरच्या रहिवासी. त्यांनी २००७ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांना ४०९ रँक मिळाली होती. त्यांनी खूप मेहनतीने हे यश मिळवलं होतं.

शिक्षण

आयएएस बी चंद्रकला यांचे पूर्ण नाव भूख्या चंद्रकला नीरू असे आहे. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण करीमनगर येथून केंद्रीय विद्यालयातून केले. त्यानंतर त्यांनी हैदराबादमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर त्यांनी इकोनॉमिक्समध्ये एम ए केले.

लग्नानंतर दिली यूपीएससी परीक्षा

यूपीएससीची तयारी करताना त्यांना त्यांच्या कुटुंबाची खूप साथ मिळाली. त्यांनी लग्नानंतर यूपीएससी परीक्षा दिली. त्यांच्या पतीने नेहमी त्यांची साथ दिली. ग्रॅज्युएशन करत असतानाच त्यांचे लग्न झाले होते. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. घर, कुटुंब, मुलांना सांभाळत त्यांनी परीक्षा दिली आणि त्यात यशदेखील मिळवले.

आयएएस चंद्रकला या त्यांच्या कामामुळे अनेकदा चर्चेत असतात.त्यांचा निर्भीड स्वभाव हा त्यांना इतरांपासून वेगळे ठरवतो. त्यांच्या यशामुळे त्यांच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला. त्यांच्या कुटुंबाच्या साथीमुळे त्यांनी हे यश मिळवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात छताचा भाग कोसळला

धुरळा उडाला! जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट, आयोगाने घेतला मोठा निर्णय

Asia Cup 2025: पाकिस्तानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर; श्रीलंका-बांग्लादेशाचं नुकसान, कोण गाठणार फायनल?

'Bigg Boss 19'च्या घरात तान्या मित्तल झाली राजकुमारी; अमाल मलिकने स्वतःच्या हातांनी जेवण भरवले, पाहा VIDEO

OLA, Uber आणि Rapido च्या मनमानीला ब्रेक; सरकार ठरवणार रेट, जाणून घ्या नवे भाडेदर

SCROLL FOR NEXT