Subhadra Yojana Saam Tv
बिझनेस

Subhadra Yojana: काय आहे सुभद्रा योजना? महिलांना मिळणार ५०,००० रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यात महिला आणि लहान मुलांसाठी खास योजना आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात विविध योजना राबवल्या आहेत. प्रत्येक राज्याच्या महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. यातीलच एक योजना म्हणजे सुभद्रा योजना.

सुभद्रा योजना ही ओडिशा राज्य सरकारने राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ५०,००० रुपये देण्यात येणार आहे.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे. (Subhadra Yojana)

काय आहे योजना? (Subhadra Yojana)

ओडिशा सरकारची सुभद्रा योजना ही ५ वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. महिलांना दरवर्षी या योजनेअंतर्गत १०,००० रुपये मिळणार आहे. त्यामुळेच ५ वर्षांसाठी ५०,००० रुपये महिलांना देण्यात येणार आहे. दरवर्षी दोन टप्प्यांमध्ये हे पैसे देण्यात येणार आहे. ५००० रुपये प्रत्येक हप्त्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे. एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशातून योजना सुरु करण्यात आली आहे. (Scheme For Womens)

पात्रता

सुभद्रा योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे. अर्ज करणारी महिला मूळची ओडिशा राज्याची रहिवासी असावी. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरी करत नसावे. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतात. त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ओडिशा सरकारने १७ सप्टेंबर पासून ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत दोन हप्त्यांमध्ये पैसे दिले जाणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता लवकरच महिलांना दिला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari : नवीन तंत्रज्ञानाने १० वर्षांत रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही...; गडकरींची भर कार्यक्रमात गॅरंटी

Uday Samant News: पायलटचा टेक ऑफला नकार, उदय सामंतांना करावा लागला कारने प्रवास, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?

Chandrapur News: चंद्रपुरमधील शाळा अदानींच्या ताब्यात! राज्य सरकारचा मोठा निर्णय; १५ दिवसात व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश

Viral News: अबब...! तरुणीच्या डोक्यावर चक्क वेटोळे मारुन बसला साप; VIDEO व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

SCROLL FOR NEXT