Subhadra Yojana Saam Tv
बिझनेस

Subhadra Yojana: महिलांना वर्षाला मिळणार १०,००० रुपये; सुभद्रा योजनेबद्दल जाणून घ्या सर्वकाही

Subhadra Yojana For Women: केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकारनंतर अनेक राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. ओडिशा सरकारने महिलांसाठी खास सुभद्रा योजना राबवली आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. केंद्रासोबतच अनेक राज्य सरकारने महिलांसाठी योजना राबवल्या आहे. ओडिशा सरकारने महिलांसाठी सुभद्रा योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना १० हजार रुपये दिले जाणार आहेत.

सुभद्रा योजनेत वर्षाला दोन हप्त्यांमध्ये १० हजार रुपये दिले जातात.सुभद्रा योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते. (Subhadra Scheme)

सुभद्रा योजनेत २१ ते ६० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात. ही योजना ५ वर्षांसाठी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षा महिलांना ५०,००० रुपये दिले जाणार आहेत. महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी ही योजना राबवण्यात येतात. ही एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वतः च्या पायावर उभे राहू शकतात. स्वतः चा व्यवसायदेखील सुरु करु शकतात.

सुभद्रा योजनेत अर्ज करणाऱ्या महिला या ओडिशाच्या रहिवासी असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे नाव राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम आणि राज्य खाद्य सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन कार्डशी नाव जोडलेले असावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५० लाख रुपये असणे गरजेचे आहे. याचसोबत २१ ते ६० वयोगटातील महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

विविध राज्याच्या योजना

विविध राज्य सरकारने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. झारखंड सरकारने मैया सन्मान योजना राबवली आहे. दिल्ली सरकार महिला सन्मान योजना राबवणार आहे. या सर्व योजनांमध्ये महिलांना आर्थिक मदत मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Freedom Offer: १ रुपयाच्या रिचार्जमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉल अन् 60GB डेटा, ३० दिवस चालणार

FAStag Annual Pass: ३००० रुपयात मिळणार FAStag वार्षिक पास; वाहनधारकांना होणार ५ फायदे; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : श्रावण महिन्याच्या दुस-या सोमवारी भिमाशंकरला भाविकांनी गर्दी केली

Heart attack: महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या आठवड्याभरापूर्वी दिसतात 6 मोठे बदल; ही लक्षणं कोणती आहेत वाचा

बाथरूम घुसले अन् इनरवेअरची तपासणी, पोलिसांनी नको ते प्रश्न विचारले; पुण्यातील तरूणीचे धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT