Subhadra Yojana Saam Tv
बिझनेस

Subhadra Yojana: या राज्याचे सरकार महिलांना देतंय १०,००० रुपये; सुभद्रा योजना नेमकी आहे तरी काय?

Subhadra Yojana For Women: सरकारने महिलांसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी १०,००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने आतापर्यंत नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील अनेक योजना या महिलांसाठी राबवण्यात आल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने योजना राबवलल्या जातात. अशीच एक योजना म्हणजे सुभद्रा योजना. सुभ्रदा योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत केली जाते.

सुभ्रदा योजनेअंतर्गत महिलांना १०,००० रुपये दिले जातात. ओडिशा सरकारने ही योजना राबवली आहे. ओडिशा सरकारने महिलांना वर्षाला १०,००० रुपये देण्याची घोषणा केली होती. ही योजना पुढील ५ वर्षांसाठी राबवण्यात आली आहे. (Odisha Government Scheme)

ओडिशा सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या योजनेला सुरुवात तेली. या योजनेत लाभ घेणारी महिला ही ओडिशा राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे. त्याचसोबत २१ ते ६० वयोगटातील महिला या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.

या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलेकडे ओडिशा राज्याचे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे.तसेच महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असायला हवे.याच महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. (Subhadra Yojana For Women)

सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना वर्षातून दोनवेळा पैसे मिळणार आहेत.या योजनेत तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने https://subhadra.odisha.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

SCROLL FOR NEXT