Share Market  Saam Tv
बिझनेस

Share Market Today : शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १४०० अंकानी घसरला, झटक्यात गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी बुडाले

Share Market Today Update : शेअर बाजार दिवसाच्या सुरुवातीला तेजीत होता. मात्र, काही तासानंतर शेअर बाजाराने यू-टर्न घेतला. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळाने सेन्सेक्स १४३४ अंकानी घसरला.

Vishal Gangurde

मुंबई : शेअर बाजार दिवसाच्या सुरुवातीला तेजीत होता. मात्र, काही तासानंतर शेअर बाजाराने यू-टर्न घेतला. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळाने सेन्सेक्स १४३४ अंकानी घसरला. तर निफ्टी २२,७९४ अंकापर्यंत गेला.

आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास निफ्टी २५० अंकानी घसरून २२,४०० अंकावर आला. तर सेन्सेक्स ९१६ अंकांनी घसरून ७३,६९५ पर्यंत आला. तर बँक निफ्टी ४७५ अंकांनी घसरून ४८,७६५ वर आला. आज बीएसईच्या टॉप ३० शेअरपैकी २८ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. बजाज फायनान्सच्या स्टॉकमध्ये २ टक्के तेजी पाहायला मिळाली. तर भारती एयरटेलचा शेअरदेखील २ टक्क्यांनी घसरला.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या २५५३ शेअरपैकी ७६३ स्टॉकमध्ये तेजी होती. तर १६८९ स्टॉकमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. त्याचबरोबर १०१ शेअरमध्ये कोणताही बदल दिसला नाही. १३३ शेअरने ५२ आठवड्यातील मोठी उसळी घेतली. ७ शेअरमध्ये मोठी पडझड दिसली.

दरम्यान, आज शुक्रवारी सेन्सेक्सने ४६० अंकांनी उसळी घेऊन ७५,०९५.१८ अंकावर पोहोचला. तर निफ्टीने १५० अंकानी उसळी घेऊन २२,७९४ उच्चांकी पातळीवर पोहोचला.

६ स्टॉक्समध्ये मोठी घसरण

शेअर बाजारात CEAT टायर स्टॉकमध्ये ४.२ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. ज्योती लॅब्स ३.६ टक्के, ब्लू स्टार शेअर ३ टक्के, एमआरएफ शेअर ३ टक्के, टाटा ट्रेंट शेअर ३ टक्के आणि आयसीआयसीआय लॉम्बोर्डच्या स्टॉकच्या शेअरमध्ये २.७ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली.

गुंतवणूकदारांचे ३ कोटी बुडाले

बीएसईच्या सर्व लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायजेशनमध्ये ३ लाख कोटी रुपयांनी घट झाली. त्यानंतर मार्केट कॅपिटलायजेशन ४०५.८३ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. तर आज बीएसई शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं २.६७ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.

नोट - शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी मार्केट एक्‍सपर्टचा सल्ला जरूर घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT