Share Market Saam Tv
बिझनेस

Stock Market : 1990 मध्ये किती होता सेन्सेक्स? 2024 मध्ये थेट 80000 अंकांवर पोहोचला, कोणत्या वर्षी किती हजारांवर? टप्पे जाणून घ्या

Stock Market today : 2024 मध्ये थेट 80000 अंकांवर पोहोचला आहे. कोणत्या वर्षी सेन्सेक्स किती हजारांवर होता. याचे सर्व टप्पे जाणून घ्या.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्स ८० हजार पार गेला आहे. तर निफ्टीनेही ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्सने तब्बल एका महिन्यात मोठी झेप घेतली आहे. १९९० साली १००० अंकावर असलेला सेन्सेक्स आजघडीला ८०००० वर पोहोचला आहे. मागील तीन दशकांपासून सेन्सेक्सची ऐतिहासिक घौददौड सुरुच आहे.

शेअर बाजारात ४ जून रोजी गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटी बुडाले होते. त्यानंतर एका महिन्यांनी शेअर बाजारात मोठे बदल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात मागील तीन दशकात मोठे बदल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसला होता. एक्झिट पोलच्या अंदाजाचाही परिणामही शेअर बाजारावर दिसला होता.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. बीएसईच्या ३० शेअरवाला सेन्सेक्स १७०० घसरून ट्रेडिंग सुरु होती. तर गुरुवारी दुपारी १२.३० वाजता सेन्सेक्स ६०९४ अंकानी घसरून ७०,३७४ अंकावर पोहाचला होता.

फक्त सेन्सेक्स नाही तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी-५० देखील १९४७ अंकानी घसरला होता. निफ्टी-५० हा २१, ३१६ अंकावर पोहोचला होता. कोरोना काळातही शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली होती. शेअर मार्केट क्रॅश झाल्यानंतर बीएसई मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे एकाच दिवशी ३० लाख कोटी रुपये बुडाले होते.

शेअर बाजारात १९९० साली सेन्सेक्स हा १००० अंकावर ट्रेडिंग करत होता. त्यानंतर पुढील दोन वर्षांनी सेन्सेक्स २००० अंकावर पोहाचला. त्यानंतर १९९९ साली सेन्सेक्स ५००० अंकावर पोहाचला.

२००६ साली सेन्सेक्स १०००० अंकावर पोहोचला. त्यानंतर वर्षांत शेअर बाजारात ऐतिहासिक घडामौड झाली. शेअर बाजारात सेन्सेक्स थेट २०००० अंकावर पोहोचला. २०१९ साली सेन्सेक्स ४०००० हजारांवर पोहोचला होता. त्यानंतर २०२४ साली हाच सेन्सेक्स ८०००० अंकावर पोहाचला आहे.

दरम्यान, शेअर बाजारात सेन्सेक्सने ४०० अंकानी उसळी घेत ८०,३२१.७९ अंकावर सुरु झाला. शेअर बाजारात उघडल्यानंतर काही मिनिटात सेन्सेक्सने ४०० अंकानी उसळी घेतली. त्यानंतर सेन्सेक्सने ऐतिहासिक उसळी घेतली. तर निफ्टीनेही ऐतिहासिक उच्चांक गाठला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT