Stock Market
Stock Market Yandex
बिझनेस

Stock Market: गुढीपाडव्याच्या दिवशी सेन्सेक्सने पहिल्यांदाच गाठला 75 हजारांचा टप्पा, निफ्टीनेही रचला विक्रम

Rohini Gudaghe

Stock Market Sensex Update

आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने नवा विक्रम केला आहे. आज सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर बॉम्बे स्टॉक (Share Market On Gudhi Padwa) एक्सचेंज (BSE) च्या सेन्सेक्सने मोठी झेप घेतली आहे. पहिल्यांदाच 75,000 चा टप्पा पार केला. सेन्सेक्ससोबतच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) चा निफ्टी निर्देशांकही रॉकेटच्या वेगाने धावला आहे. तो 22,700 च्या नवीन शिखरावर पोहोचला. (Latest Weather Update)

आज उत्कृष्ट जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजारात जोरदार गतीने व्यवहार (Share Market) सुरू झाला. BSE सेन्सेक्सने सकाळी 9.15 वाजता पहिल्यांदा 75000 चा टप्पा ओलांडला. सेन्सेक्स 75,124.28 वर उघडला. ही त्याची आतापर्यंत सर्वकालीन उच्च पातळी आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स 74,742.50 च्या पातळीवर बंद झाला होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एनएसई निफ्टी देखील सेन्सेक्सच्या हालचालीशी जुळत असल्याचं यावेळी दिसून आलं. निफ्टीने 22,765.10 च्या विक्रमी पातळीवर व्यापार सुरू केला. एनएसईचा हा निर्देशांक मागील व्यवहाराच्या दिवशी 22,666.30 च्या पातळीवर बंद झाला (Share Market) होता.

शेअर बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीला 1,662 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 584 शेअर्स लाल रंगात व्यापार करत होते होते. 97 समभागांच्या स्थितीत कोणताही बदल झाला (Share Market News) नाही. सेन्सेक्सची सुरुवातीची गती कायम राहिली आहे. 15 मिनिटांच्या व्यापारानंतर सेन्सेक्स त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून थोडासा घसरला आहे. सध्या सेन्सेक्स 281.85 अंकांच्या किंवा 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 75,024.35 च्या पातळीवर व्यापार करत आहे.

सोमवारी शेअर बाजाराने जोरदार वाढीसह नवीन उच्चांक गाठला होता. आज हा विक्रम मोडत त्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला. सोमवारी बाजार बीएसई सेन्सेक्स 428 अंकांच्या वाढीसह 74,742.50 वर बंद झाला (Stock Market Sensex Update) होता. एनएसई 152.60 अंकांनी वाढून 22,666.30 च्या पातळीवर बंद झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे बाजार भांडवल (BSE MCap) सुरुवातीच्या व्यवहारातच 401.10 लाख कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते.

सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये गोदरेज प्रॉपर्टीजचे शेअर्स बीएसईवर 5.85 टक्के म्हणजेच 151 रुपयांच्या वाढीसह 2,739.40 रुपयांवर व्यवहार करत होते. याशिवाय इन्फोसिसचा शेअर 2.09 टक्क्यांनी वाढून 1508 रुपयांवर पोहोचला होता. इतर वाढत्या समभागांमध्ये, टाटा स्टील (1.21%), एचसीएल टेक्नॉलॉजीज (1.05%), एक्साइड इंडस्ट्रीज (2.31%) आणि टाटा ग्रुपची व्होल्टास कंपनी 1.91% वाढीसह व्यवहार करत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri-Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरात कोसळलं भलं मोठं होर्डिंग; दुचाकींसह वाहनं दबल्याची भीती, पाहा Video

Shahada News : शहाद्यात महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास

Kitchen Tips: कापलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यास काय होते?

Virat Kohli Viral Video:'बॅटने मारेन..' लाईव्ह सामन्यात विराट कोहली रिषभ पंतवर भडकला - Video

Today's Marathi News Live : वाशिमच्या शिरपूर जैन मंदिरातील पूजेवरून पुन्हा वाद, महेश महाराज यांना मारहाण

SCROLL FOR NEXT