Stock Market Crash  Saam Tv
बिझनेस

Stock Market Crash : शेअर बाजार धडाम; गुंतवणूकदारांचे १.३ लाख कोटी बुडाले, ५ स्टॉक्समध्ये अधिक घसरण

Vishal Gangurde

मुंबई : शेअर बाजारात बुधवारी पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. बाजार सुरु होताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० शेअरच्या सेन्सेक्समध्ये ५५० अंकांनी घसरण झाली. तर निफ्टीमध्ये १५० अंकांनी घसरण झाली. शेअर बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीच्या अंकात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे १.३ लाख कोटींचं नुकसान झालं. यावेळी पीएनबी हाऊसिंगच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.

शेअर बाजारात गुरुवारी व्यवहाराची सुरुवात पडझडीने झाली. बीएसई सेन्सेक्सने ३२३.९८ म्हणजे ०.४३ टक्क्यांनी घसरण झाली. त्यामुळे बीएसई सेन्सेक्स ७४.८४६.४७ पातळीवर सुरु झाला. काही मिनिटानंतर ७४,५२९.५६ अंकापर्यंत घसरला. त्यानंतर सकाळी ११.३५ वाजता सेन्सेक्स ५९०.६३ अंकानी घसरला.

निफ्टीमध्येही घसरण

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी इंडेक्समध्येही बाजार सुरु होताच घसरण पाहायला मिळाली. बाजार सुरु झाल्यानतंर निफ्टी १०९.१० अंकांनी घसरला.

पीएनबी हाऊसिंगच्या शेअरमध्ये घसरण

शेअर बाजारात व्यवहार सुरु झाल्यानंतर ९७४ शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर १३७८ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. तसेच ९७ शेअरमध्ये कोणतेही बदल झाल्याचे दिसून आलं नाही. पीएनबी हाऊसिंगच्या शेअरमध्ये ७ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली.

Hindware, Ujjivan स्मॉल फायनान्स, आयआरसीटीसी शेअर, आयसीआयसीआय बँक शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. या व्यतिरिक्त बीपीसीएल, एम अँड एम, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एनटीपीसी आणि Tata Consumer या शेअरमध्येही घसरण पाहायला मिळाली.

गुंतवणूकदारांनी १.३ लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात घसरणीनंतर बीएसई मार्केट कॅप 416.92 लाख कोटींनी घसरून 415.58 लाख कोटी रुपयांवर आला. यामुळे काही मिनिटात गुंतवणूकदारांचे १.३ लाख कोटी बुडाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

SCROLL FOR NEXT