Stock Market High Saam Tv
बिझनेस

Stock Market High: सेन्सेक्सची ऐतिहासिक झेप! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचा झाला 1.51 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला

Stock Market Today: आज शेअर बाजारात सेन्सेक्सने ऐतिहासिक झेप घेतली आहे. आज सेन्सेक्सने पहिल्यांदाच 76,000 चा टप्पा ओलांडला. तर निफ्टीनेही 23110 चा आकडा पार केला.

Satish Kengar

शेअर बाजारात आज सर्व विक्रम मोडले गेले असून सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उंची गाठली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. आज 599 अंकांच्या उसळीसह सेन्सेक्सने 76,010 चा उच्चांक गाठला आहे. तर निफ्टीनेही 23110 चा आकडा पार केला आहे. या वाढीमुळे बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये 1.51 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, इन्फोसिस, टीसीएस, ॲक्सिस बँक आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये वाढ झाली. त्यामुळे सेन्सेक्सची ऐतिहासिक झेप पाहायला मिळाली. आज बीएसईचे मार्केट कॅप 1.51 लाख कोटी रुपयांच्या वाढीसह 421.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

आज बीएसईमधील 215 कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्यांचा उच्चांक गाठण्यात यशस्वी ठरले आहेत. बीएसई 500 मध्ये आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल इंडिया, अदानी पोर्ट्स, अशोक लेलँड, बीईएल, भारत फोर्ज, एअरटेल, कोचीन शिपयार्ड यांच्या शेअर्सच्या किमती 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आली तेजी

फिनोलेक्स केबल्स, एजिस लॉजिस्टिक्स, इंडियन ओव्हरसीज बँक, जेबीएम ऑटो, ग्लेनमार्क फार्मा, यूको बँक, जेबी केमिकल्स, एस्ट्राझेनेका फार्मा, आरसीएफ यांच्या शेअर्सला आज शेअर बाजारात मोठी मागणी होती.

एनएसई निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 26 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आणि 23 शेअर्समध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज निफ्टी मिडकॅप पहिल्यांदा 53,043.60 ची पातळी गाठली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT