Success Story saam tv
बिझनेस

Success Story: अवघ्या २००० रूपयांची गुंतवणूक करून सुरु केला वेगळा बिझनेस; आज कमावतात लाखोंनी पैसा

Success Story: जर तुम्हालाही बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला सुधाची कथा प्रेरणादायी ठरेल. तमिळनाडूमध्ये राहणाऱ्या सुधाने अवघ्या २००० हजार रूपयांची गुंतवणूक करून बिझनेसला सुरुवात केली होती.

Surabhi Jayashree Jagdish

बिझनेस सुरु करणं हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. मात्र गुंतवणूकीसाठी लागणारे पैसे आणि व्यवसाय चांगला सुरु राहणं या दोन्ही गोष्टींच्या भीतीमुळे अनेकजण बिझनेस करण्याचा विचार करत नाहीत. जर तुम्हालाही बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला सुधाची कथा प्रेरणादायी ठरेल. तमिळनाडूमध्ये राहणाऱ्या सुधाने अवघ्या २००० हजार रूपयांची गुंतवणूक करून बिझनेसला सुरुवात केली होती.

सुधा या तामिळनाडूच्या नमक्कल जिल्ह्यात राह असून त्यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सुधा यांनी Ini Organics मध्ये केवळ 2000 रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. हा एक मसाला स्टार्टअप असून त्या यातून मोठी कमाई करतायत.

व्यवसायाची कल्पना कशी सुचली?

सुधा अभ्यासात फार हुशार होत्या. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2011 मध्ये त्यांनी पौष्टिक आहाराच्या देण्याच्या टिप्स देत होती. यावेळी सुधा यांनी आपल्या मुलीला चविष्ट आणि पौष्टिक आहार देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करण्यास सुरुवात केली. त्यांनी मुलीला डोसा खायला देण्यासाठी मोरिंगा पावडर आणि पुदिना पावडर बनवायला सुरुवात केली. या मसाल्यांसोबत ती डोसा सर्व्ह करायची, जो त्यांच्या मुलीलाही खूप आवडायचा.

यावेळी सुधा यांनी अनेक डाळींपासून मिलर पावडर बनवली. ही पावडर किंवा मसाले जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरण्यात येतात. त्यानंतर हीच गोष्ट वापरून त्यांनी मसाला बनवण्याच्या व्यवसायात रूपांतर केल्याचा विचार केला. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी काम करून पैसे जमवले.

सुधाने व्यवसायाची सुरुवात कशी केली?

यानंतर सुधा यांनी लवकरच आपलं संपूर्ण लक्ष मसाल्यांच्या व्यवसायाकडे वळवले. सुधा यांनी 2018 मध्ये इंडियन ऑरगॅनिक्सच्या नावाने स्वतःची कंपनी उघडली. या कंपनीची नोंदणी देखील करण्यात आली आहे. सुधा शेतकऱ्यांकडून मोरिंगा, पालक, पुदिना, कोथिंबीर खरेदी करायची. यानंतर त्या मसाले बनवायची आणि विकायची.

सध्या लाखांची करतात कमाई

तिने हळूहळू सांबर आणि रस्सम मसाला बनवायला सुरुवात केली. याशिवाय सुधा यांनी तामिळनाडू कृषी विद्यापीठ आणि अनेक कृषी संस्थांकडून प्रशिक्षणही घेतलं. त्यांनी पॅकेजिंग आणि मार्केटिंगची योग्य पद्धत शिकली. या ज्ञानाचा वापर त्यांनी व्यवसायात केला. व्यवसाय वाढवायचा असताना त्यांनी एका नातेवाईकाकडून 2 लाख रुपयांचे कर्जही घेतलं. आज त्याच्या कंपनीची अनेक वेगवेगळी दुकानं असून त्यांची कमाई लाखांच्या घरात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT