PPF VS SIP Saam Tv
बिझनेस

PPF VS SIP: एसआयपी की पीपीएफ? कोणती गुंतवणूक बनवेल तुम्हाला करोडपती

PPF And SIP Scheme : अनेकजण वेगवेगळ्या स्कीमध्ये गुंतवणूक करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PPF And SIP Benefits

आजकाल सर्वजण अनेक गुंतवणूकीचे मार्ग शोधत असतात. अनेकजण वेगवेगळ्या स्कीमध्ये गुंतवणूक करतात. काही लोक सुरक्षित योजनांमध्ये गुंतवणूक करतात. तर काही लोक योग्य परतावा मिळेल अशाच स्किममध्ये गुंतवणूक करतात. अनेकांना कोणत्या स्कीममध्ये जास्त फायदा आहे याबाबत शंका असते.

शेअर मार्केटमध्ये अनेक योजना आहेत. त्यात एसआयपी (SIP) आणि पीपीएफ (PPF) या दोन योजनांमध्ये लोक जास्त प्रमाणात गुंतवणूक करतात. पीपीएफ ही एक सरकारी योजना आहे. ज्यात 7.1% परताव्याची हमी असते. एसआयपी योजना ही शेअर मार्केटशी संबंधित आहे. याद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करु शकतात. एसआयपीमध्ये कोणत्याही प्रकारचे व्याज निश्चित नसते. परंतु तज्ज्ञांच्या मते, एसआपीमध्ये सरासरी १२ टक्के परतावा मिळतो.

पीपीएफ (PPF)

पीपीएफ ही सरकारी योजना आहे. ही योजना १५ वर्षांमध्ये मॅच्युअर होते. परंतु तुम्ही ती ५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता. या योजनेत तुम्ही वार्षिक १.५ लाख रुपये गुंतवू शकता. जर तुम्ही वार्षिक १.५ लाख रुपये गुंतवत असाल तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला १२,५०० रुपये गुंतवावे लागतील. अशा प्रकारे १५ वर्षात २२,५०,००० रुपये गुंतवल्यास मॅच्युरीटीनंतर तुम्हाला ४०,६८,२०९ रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्ही २५ वर्षे गुंतवणूक केल्यास तुम्ही करोडपती होऊ शकता.

एसआयपी (SIP)

एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ आणि रक्कम यावर कोणतीही मर्यादा नाही. यात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पैसे गुंतवू शकता. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला १२,५०० रुपये म्हणजे वर्षाला १.५ लाख रुपये गुंतवत असाल तर १९ वर्षात तुमची गुंतवणूक २८,५०,००० रुपये होईल. यावर तुम्हाला १२% परताव्यानुसार, तुम्हाला १,०९,४१,५६८ रुपये मिळतील. त्यामुळे तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असाल तर कमी वेळात तुम्ही करोडपती बनू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

SCROLL FOR NEXT